Bjip insists on tender cancellation Solid Waste Project in Sangli; Statement of BJP leaders 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली घनकचरा प्रकल्प निविदा रद्दवर ठाम; भाजप नेत्यांचे प्रतिपादन

बलराज पवार

सांगली : घनकचरा प्रकल्पाच्या निविदा प्रक्रिया रद्दचा ठराव आणि कुपवाडमध्ये मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसंदर्भातील ठराव यावर आम्ही ठाम आहोत. वारणाली हॉस्पिटलसाठी निविदा काढली असली, तरी याबाबत आयुक्तांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, महापालिका नेते शेखर इनामदार, महापौर गीता सुतार यांच्यासह पदाधिकारी, नेत्यांनी पत्रकार बैठकीत दिली. 

महापालिका मुख्यालयाची नवी इमारत विजयनगर येथे उभारण्यात येणार आहे. त्यासह कुपवाड हॉस्पिटल, शहरातील रस्ते तसेच अन्य विकासकामासंदर्भात आमदार सुधीर गाडगीळ यांच्या संपर्क कार्यालयात बैठक झाली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, महापौर गीता सुतार, उपमहापौर आंनदा देवमाने, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, माजी आमदार दिनकर पाटील, शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, महापालिका नेते नगरसेवक शेखर इनामदार, भाजपचे पश्‍चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे, महिला आघाडीच्या नेत्या नीता केळकर, सुरेश आवटी, नगरसेवक गजानन मगदूम, गटनेते युवराज बावडेकर आदी उपस्थित होते. 

श्री. देशपांडे म्हणाले, विजयनगर येथे महापालिका मुख्यालयाची नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. अडीच एकर जागेत होणाऱ्या या इमारतीच्या आराखड्याबाबत आर्किटेक्‍ट प्रमोद परीख यांनी सादरीकरण केले. यामध्ये काही त्रुटी होत्या. त्या बदलण्याची सूचना आर्किटेक्‍ट परीख यांना करण्यात आली. त्या दूर करुन येत्या 10 नोव्हेंबरपर्यंत अंतिम आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया होणार आहे. भाजप सत्तेच्या काळातच महापालिकेची देखणी इमारत उभी राहील. 

श्री. इनामदार म्हणाले, "महापुरानंतर कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचण असतानाही भाजपने महापालिकेत चांगला कारभार केला आहे. महापौर, उपमहापौरांनी आपत्ती व्यवस्थापनाचा 47 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. घनकचरा निविदा प्रक्रिया रद्द करणे आणि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसाठी कुपवाडमधील जागा या दोन्हीच्या ठरावावर आम्ही ठाम आहे, असे शेखर इनामदार यांनी स्पष्ट केले. याबाबत लवकरच आयुक्तांना भेटणार आहोत. त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगू. निविदा प्रसिद्ध झाली असली तरी, पुढील प्रक्रिया होणार नाही,' असे ते म्हणाले. 

भविष्यात एकवाक्‍यता ठेवू 
इनामदार म्हणाले, "महापालिकेत पदाधिकारी आणि प्रशासन यांच्यात बेबनाव असल्याचे टीका होत आहे, मात्र असे काही नाही. भविष्यात प्रशासन, पदाधिकारी यांच्यामध्ये एकवाक्‍यता असेल. राज्यात सत्ता बदल झाल्याने विरोधकांना बळ आले आहे, मात्र विरोधाला विरोध ही आमची कार्यपद्धती नाही, असा टोलाही त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीला हाणला. 

सांगली, मिरजेत ट्रीमिक्‍स रस्ते 
सांगलीत राम मंदिर चौक ते सिव्हिल हॉस्पिटल व मिरजेतील रेल्वे स्टेशन ते एस टी स्टॅंड हे दोन्ही रस्ते प्रायोगिक तत्त्वावर ट्रीमिक्‍स पद्धतीने करण्यात येणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते या रस्त्यांच्या कामांचे उद्‌घाटन करण्यात येणार असल्याचे उपमहापौर आनंदा देवमाने यांनी सांगितले. 

संपादन :  युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT