BJP announces three district presidents marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

अखेर भाजपचे कारभारी ठरले

सकाळ वृत्तसेवा

नगर : भारतीय जनता पक्षाने आज जिल्ह्यातील तीनही जिल्हाध्यक्ष जाहीर केले. त्यात नगर शहर जिल्हाध्यक्षपदी महेंद्र गंधे, दक्षिणेतून अरुण मुंडे व उत्तरेची जबाबदारी राजेंद्र गोंदकर यांच्यावर सोपवण्यात आली. पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेतील माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीच आज या निवडी जाहीर केल्या.

जिल्हाध्यक्ष निवडीत चुरस निर्माण झाली होती. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुलाखतीनंतर हा पेच प्रदेश पातळीवरून सोडविला जाईल, अशी भूमिका त्या वेळी बागडे यांनी स्पष्ट केली होती. जिल्हाध्यक्षपदासाठी त्या वेळी 30 इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या. 

विखे पाटील गटाची सरशी

दरम्यान, जिल्ह्यात ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील गटाच्या विरोधात असलेल्या माजी मंत्री राम शिंदे यांची टीम उभी ठाकली आहे. विखे यांना शह देण्यासाठी ज्यांच्या नावाची शिफारस केली, त्यांची नावे ऐनवेळी मागे पडल्याने पदाधिकारी निवडीच्या राजकारणात अखेर विखे पाटील गटाची सरशी झाल्याचे दिसते.

मागील आठवड्यात बैठक

मागील आठवड्यात शुक्रवारी (ता. 10) पक्षाच्या नगरमधील तीन जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी बागडे यांच्याच प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, वैभव पिचड, स्नेहलता कोल्हे, भानुदास बेरड, दिलीप गांधी यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

पक्षांतर्गत गटातटाचे राजकारण

जिल्हाध्यक्षपदासाठी दक्षिणेतून 17, उत्तरेतून 14 आणि नगर शहरातून आठ जण इच्छुक होते. बागडे यांनी त्या वेळी इच्छुकांना माघारीची विनंतीही केली होती. तथापि, पक्षांतर्गत गटातटाचे राजकारण व चुरशीमुळे कोणीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. अखेरीस एकमत न झाल्याने प्रत्यक्ष मुलाखती घेण्याचा निर्णय बागडे यांनी घेतला.

चेंडू प्रदेशच्या कोर्टात

एकेक करीत मुलाखतीदेखील घेतल्या. अखेरीस जिल्हाध्यक्षपदाचा प्रत्येकाचा अट्टहास पाहून त्यांनी कोअर कमिटीशी चर्चा करून निवडीचा चेंडू प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या कोर्टात टाकून मोकळे झाले. 

यांचा झाला भ्रमनिरास..! 

दक्षिण नगर : सुनील पाखरे, साहेबराव म्हसे, संतोष लगड, दिलीप भालसिंग, रवींद्र कडूस, सुभाष गायकवाड, अशोक चोरमले, शांतिलाल कोपनर, राहुल कारखिले, भानुदास बेरड, विश्‍वनाथ कोरडे, दत्ता हिरणवाळे, युवराज पोटे, स्वप्नील देसाई, नामदेव राऊत, बाळासाहेब पोटघन. 

उत्तर नगर : विठ्ठल शिंदे, शिवाजी धुमाळ, राजेंद्र देशमुख, भरत फटांगरे, भानुदास डेरे, हरिभाऊ चकोर, राजेश चौधरी, नितीन जोशी, राजेंद्र गोंदकर, नितीन कापसे, प्रकाश चित्ते, जालिंदर वाकचौरे, शिवाजी गोंदकर, बाळासाहेब मुरकुटे. 

नगर शहर : जगन्नाथ निंबाळकर, सचिन पारखी, दामोदर बठेजा, मनेष साठे, विनोद भिंगारे, सुवेंद्र गांधी, बंटी डापसे, भैया गंधे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना लेकीनं सुनावलं, नेटकऱ्यांनाही सडेतोड उत्तर देत म्हणाली...

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Marathi News Live Updates : महादेवनगरमध्ये दुकान पेटवून दिल्याने खळबळ, पहाटे तिघांनी पेट्रोल ओतून लावली आग

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

SCROLL FOR NEXT