BJP is going to land there 
पश्चिम महाराष्ट्र

तिथं भाजप उतरणारचं 

सकाळ वृत्तसेवा

नगर : ""जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष उतरणारच आहे. उमेदवार मात्र मंगळवारी (ता. 31) जाहीर करणार आहोत,'' अशी माहिती भाजपचे नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर विखे पत्रकारांशी बोलत होते. प्रा. बेरड यांनी बैठकीतील माहिती सांगताना जिल्हा परिषदेच्या निवडीबाबत सर्वाधिकार विखे पाटील व राम शिंदे यांना दिल्याचे सांगितले. 

आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड उपस्थित होते. विखे पाटील म्हणाले, ""जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबत मुंबईतील बैठकीत पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली. आज कोअर कमिटीच्या बैठकीतही निवडणूक लढविण्याबाबत सर्वांचे एकमत झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये अल्पमतात असला, तरी पक्ष उमेदवार देणार आहे. उमेदवार कोण असेल, हे मात्र आता सांगता येणार नाही. ते निवडीच्या वेळी 31 तारखेला जाहीर करू.'' 

जिल्हा परिषदेत भाजपचे सध्या 13 सदस्य आहेत. बहुमताला 37 सदस्य आवश्‍यक आहेत. अशा परिस्थितीत काय करणार, याबाबत विखे पाटील म्हणाले, ""राजकारणात केव्हा काय होईल, ते सांगता येत नाही. आम्ही राज्यात बहुमतात असूनही सत्तेत येऊ शकलो नाही. जिल्हा परिषदेत बहुमत नसले, तरी त्यासाठी आम्ही भाजपचे सर्व नेते प्रयत्न करीत आहोत.'' 

शिवसेना सदस्यांची मुंबईत खलबते 

जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणुकीत महाविकास आघाडीसोबतच राहण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी आज पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य व जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी मुंबईत शिवसेना नेते अनिल देसाई यांची भेट घेतली. पक्षाचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर यांच्यासह संदेश कार्ले, अनिल कराळे, काशिनाथ दाते, सुषमा दराडे, गोविंद मोकाटे यांनी नेत्यांकडे त्याबाबत भूमिका मांडली. सत्तेत किमान उपाध्यक्ष व एक समिती मिळावी, अशी भूमिका जिल्हाप्रमुख व सदस्यांनी मांडली. तथापि, नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर घेतलेले निर्णय आम्हाला मान्य असतील, अशी भूमिकाही मांडल्याचे संदेश कार्ले यांनी "सकाळ'ला सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill on IND vs SL Draw: "२५० षटकं अन् सलग तीन दिवस फिल्डिंग..." फॉलोऑननंतरही सामना ड्रॉ राहिल्याबद्दल गिल काय म्हणाला?

Marathi News Live Updates : टीएमसी कार्यालयात गोंधळ उडाला

Manora News : कृषी केंद्राचा परवाना रद्द न करण्यासाठी २५ हजारांची लाच; मंडळ कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Hotel Business : हॉटेल व्यवसायाला ग्राहकांच्या अविश्वासाचा फटका! एफडीए कारवाईनंतर शहरातील रेस्टॉरंटमध्ये २० टक्क्यांपर्यंत घट

Pune News : स्थायी समितीतील निर्णय फिरवला! टक्केवारीच्या ‘दुर्गंधी’ने स्वच्छ सेवक साहित्याविना

SCROLL FOR NEXT