Sangli Lok Sabha Esakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Sangli Loksabha: विशाल पाटील यांच्यावर शिवसेनेने अन्याय केला,’’ असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी आज येथे व्यक्त केले.

Sandip Kapde

सांगली: ‘‘सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतच फूट पडली आहे. विशाल पाटील व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे चंद्रहार पाटील हे दोघे महाविकास आघाडीचे उमेदवार परस्परांशी लढत आहेत. त्याचा लाभ भाजप महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांना होऊन ते विजयाची हॅट्‍ट्रिक करतील. मात्र विशाल पाटील यांच्यावर शिवसेनेने अन्याय केला,’’ असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी काल व्यक्त केले.

भाजपचे निवडणूक निरीक्षक म्हणून मंत्री कराड यांनी काल सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचार मोहिमेची माहिती घेतली, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघांतील राजकीय परिस्थिती, विरोधकांच्या हालचाली यांची माहिती घेतली.

मंत्री कराड म्हणाले, ‘‘गेल्या दहा वर्षांत केंद्रातील मोदी सरकारने केलेले भरीव काम, तसेच संजय पाटील यांनी मतदारसंघात केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने राबवलेल्या विविध योजना, सोडवलेला पाणीप्रश्न यामुळे या खेपेस निश्चितच त्यांना मोठे मताधिक्य मिळेल. स्थानिक प्रश्न महत्त्वाचे राहणारच; परंतु केंद्रात पुन्हा एकदा भक्कम, स्थिर मोदी सरकार स्थापन करायचे आहे. ’’

मंत्री कराड यांनी भाजपच्या जिल्हा कार्यालयात चर्चा केली. ज्येष्ठ नेते दीपक शिंदे, नीता केळकर, शहर-जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, पक्षाचे नेते भालचंद्र पाटील, अरविंद तांबवेकर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील उपस्थित होते. कराड दोन दिवस सांगली मतदारसंघात थांबणार असून निवडणूक प्रचाराचा आढावा घेणार आहेत. त्या संदर्भातील अहवाल पक्षाच्या प्रदेश आणि केंद्रीय शाखेला सादर करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NASA च्या उपग्रहातून भारतातील प्रदूषणाचे भीषण चित्र; संपूर्ण गंगेच्या मैदानावर धुरक्याची चादर

IND vs NZ 4th-5th ODI Team: श्रेयस अय्यरकडे वन डे संघाचे नेतृत्व; शुभमन गिल शेवटचे दोन सामने का नाही खेळणार?

सई ताम्हणकर चवीने खाते दुधातलं पिठलं; कसं बनवतात ठाऊक आहे का? तिनेच सांगितली रेसिपी, खास टीपदेखील दिली

Latest Marathi News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक कोंडी, ४-५ किमी रांगा

'अनिकेत यांच्या आधी तुम्ही राजीनामा द्या', तटकरेंवरील आरोपांवरून घारेंचा थोरवेंवर पलटवार

SCROLL FOR NEXT