BJP leaders aggressive on corporates of congress for mayor election in sangli
BJP leaders aggressive on corporates of congress for mayor election in sangli 
पश्चिम महाराष्ट्र

भाजपचे नेते आक्रमक ; राष्ट्रवादीला मतदान केलेल्या नगरसेवकांवर कारवाईचे संकेत

सकाळ वृत्तसेवा

सांगली : सांगली महापालिका महापौर निवडणुकीत भाजपच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीला मदत केली होती. त्या सहा नगरसेवकांवर कारवाई केली जाईल असा इशारा भाजपचे शहराध्यक्ष दीपक शिंदे यांनी दिला. पक्षाचा व्हीप डावलून भाजपाच्या चार आणि एक सहयोगी नगरसेवकाने कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान केले होते. यांच्यामुळेत महापासलिकेतील भाजपाची सत्ता गेली आहे. घोडेबाजार आणि पैशाचा वापर करुन काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता हस्तगत केल्याचा आरोपही भाजपाच्या वतीने केला जात आहे. 

पुढे ते म्हणाले, या नगरसेवकांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान केले आहे. अनुपस्थित राहिलेल्या दोन नगरसेवकांनी व्हिप डावलला आहे. त्यामुळे योग्य ते कायदेशीर सल्लामसलत करून अपात्रतेच्या कारवाईसाठी तातडीने पावले उचलली जाणार आहेत. जनता वेळ आल्यानंतर दाखवून देईल, पक्षही त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करणार आहे. महापालिकेत काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडीचे महापौर-उपमहापौर झाले असले तरी, महत्त्वाच्या असलेल्या स्थायी समिती सभेत भाजपचे सभापती आहेत. अन्य समित्यांवरही भाजपचे वर्चस्व आहे. 

सातपैकी सहा भाजपचे सदस्य आहेत. त्यांना व्हीप लागू होतो. या सदस्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पक्षाचा व्हीप डावलून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करणाऱ्यांमध्ये भाजपचे महेंद्र सावंत, स्नेहल सावंत, अपर्णा कदम, नसीमा नाईक यांचा समावेश आहे तर आनंदा देवमाने आणि शिवाजी दुर्वे हे दोघे गैरहजर राहिले होते. या सदस्यांवर कारवाई करण्याबाबत भाजप शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे यांनी इशारा दिला आहे.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT