Vikram-Pavaskar
Vikram-Pavaskar 
पश्चिम महाराष्ट्र

लोकसभेसाठी भाजपकडून पावसकर?

सचिन शिंदे

कऱ्हाड - सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांना संधी मिळण्याची चर्चा पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या समर्थकांत सुरू आहे. त्यांनीही त्याबाबत दुजोरा दिला आहे. निवडणुकीत युवकांची मते कॅच करण्यासाठी भाजपकडून ही खेळी खेळली जाणार असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा कऱ्हाड दौरा झाला. त्यावेळी जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतही सातारा लोकसभा उमेदवारीसाठी अनेक पदाधिकाऱ्यांनी श्री. पावसकर यांचे नाव उचलून धरले होते. त्या मागणीला श्री. दानवे यांनीही तितक्‍याच सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यातच पंतप्रधानांनी बुथ प्रमुखांशी संवाद साधताना विक्रम पावसकर यांच्या कामाचे कौतुक केले. त्यामुळे त्यांच्या संभाव्य उमेदवारीला आणखी बळ मिळाले आहे. श्री. पावसकर हे पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्याशिवाय ते हिंदू एकता आंदोलनाचेही जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी युवकांचे चांगले संघटनही केले आहे. ही मते कॅच करण्याचा अजेंडा ठेवून भाजपकडून त्यांच्या नावावर एकमत होण्याची शक्‍यता दिसते. वास्तविक त्याबाबत पक्षपातळीवर अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. मात्र, श्री. पावसकर यांचे नाव अग्रक्रमावर आहे, हेही वास्तव आहे. श्री. पावसकर यांनी हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातूनही जिल्हाभर विविध कार्यक्रम घेतले आहेत.

त्याशिवाय शहरासह ग्रामीण भागाला टार्गेट करून त्यांनी कामे केले आहे. त्यामुळे त्यांच्या संघटन कौशल्याला समोर ठेवूनच सुमारे अडीच वर्षांपूर्वी भाजपने त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. ही जबाबदारी पार पाडताना त्यांनी सगळ्याच निवडणुकीत फक्त भाजपला प्रोजेक्‍ट करत अनेक ठिकाणी विजयश्री खेचून आणल्याचेही दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara : पालघरमधून हेमंत सावरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT