Vishal Patil Sakal
पश्चिम महाराष्ट्र

वसंतदादांच्या नातवाला विकत घेण्याऐवढा भाजप मोठा नाही; विशाल पाटील

आमच्यात भांडणे लागली म्हणून अनेकांना आनंद झाला. भाजपवाले खुश झाले असतील. मात्र लक्षात ठेवा वसंतदादांच्या नातवाला विकत घेण्याऐवढी भाजप मोठा पक्ष नाही.

जयसिंग कुंभार,

सांगली - आमच्यात भांडणे लागली म्हणून अनेकांना आनंद झाला. भाजपवाले (BJP) खुश झाले असतील. मात्र लक्षात ठेवा वसंतदादांच्या नातवाला विकत घेण्याऐवढी भाजप मोठा पक्ष नाही असा हल्ला प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील (Vishal Patil) यांनी आज येथे केला. येथील वसंतदादा स्मृतीस्थळी आयोजित दादा गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. प्रदेश कार्यकारणीवरील निवडीनंतर ते नाराज असल्याची चर्चा होती.या पाश्‍वभूमीवर आज त्यांनी मेळावा घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले, ‘माझ्यावर अन्याय झाला म्हणून काही पक्षांना आनंद झाला. विशाल पाटील आमच्याकडे येतील असे त्यांना वाटले. पण आम्हाला सामावून घेण्यासाठी भाजपला खूप मोठे घोटाळे करावे लागतील. आमच्या घराण्याचे राजकारण सत्तेवर टिकलेले नाही. दादांच्या विचार पैशाने निर्माण झालेला नाही. आम्हाला गर्दीसाठी खर्च करावा लागत नाही. आम्हाला विकत घेणे भाजपला शक्य नाही. दादांचा विचार ताकद वाढवली पाहिजे. माझ्या निवडीनंतर राज्यभरातून मला फोन आले. कोण कोणते तालुके हे मला माहितही नव्हते. आता दादांचे सर्व कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षात विखुरले आहेत.त्यांना एकत्र करणे आवश्‍यक आहे. तसा माझा यापुढे प्रयत्न असेल.

दादांच्या मृत्यूनंतर जिल्ह्यात प्रकाशबापूंनी सामुहिक नेतृत्व आणले. त्यातून मोहनदादांकडे जिल्हाध्यक्ष पद गेले. त्यांचे मला नेहमीच मार्गदर्शन मिळाले. आत्ताही मी या पदासाठी कोणाकडे गेले नव्हतो. काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील यांनीही मला तू पद का मागितले नाही असे विचारले. पण मी कधीही ते मागणार नाही असे सांगितले. माझ्यासाठी राज्यभरातून काँग्रेस नेत्यांकडे फोन गेले होते. दादांच्या नातवाकडे लक्ष द्या असे म्हणत ते फोन गेले. दादांची राज्यात इतकी ताकद असताना मला जिल्ह्यात अडकून पडायचे नाही. विश्‍वजीत म्हणतात ते योग्यच आहे की जिल्हाध्यक्षपदाचा निर्णय सामंजस्याने झाला आहे. पक्षालाही मी राज्यात काम करण्यासाठी सक्षम वाटलो आहे. ’’

आता अनुकंपावर नाही

विशाल पाटील म्हणाले, ‘जिल्हा बँकेत एकाला अनुकंपावर नोकरी मिळाली. त्याला पुढे व्यवसाय सुरु करण्यासाठी नोकरी सोडली आणि त्या जागेवर भावाला घेण्यासाठी तो एमडींना भेटला. एमडी म्हणाले अनुकंपा तत्वावर एकदाच लाभ मिळतो.राजकारणातही तसेच असते माझ्या भावाला अनुकंपावर यश मिळाले. मीही तसा लाभ घेण्याचा प्रयत्न केला मात्र मात्र ते मला जमले नाही. त्यामुळे आता परीक्षा देऊन, अभ्यास करून मी यशस्वी होणार. त्याची ही सुरवात आहे. वारसा हक्काने फक्त प्रॉपर्टी मिळते. आमच्याकडे वारसा हक्काने मान आणि प्रेम आले आहे. राज्य काँग्रेसमय झाले पाहिजे. दादांच्या लोकांकडे राज्य आले पाहिजे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT