BJPs district president will be elected by state president 
पश्चिम महाराष्ट्र

भाजप जिल्हाध्यक्षपदासाठी "उदंड झाले इच्छूक' 

विनायक लांडे

नगर : भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदांसाठी "उदंड झाले इच्छूक', असे म्हणण्याची वेळ आली. या पदासाठी मोठी चुरस निर्माण झाल्याने जिल्हाध्यक्ष निवडीचा चेंडू प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात पाठविण्यात आला आहे. लवकरच जिल्हाध्यक्ष जाहीर केले जातील, असा विश्‍वास विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केला. 

शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयात शुक्रवारी (ता.10) भाजप जिल्हाध्यक्षपदासाठी निवडीचा कार्यक्रम आयोजित केला होता. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, माजी खासदार दिलीप गांधी, माजी आमदार वैभव पिचड, शिवाजी कर्डिले, राम शिंदे, बाळासाहेब मुरकुटे व स्नेहलता कोल्हे, भानुदास बेरड आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाला सकाळी साडेबारा वाजता सुरवात झाली. दक्षिण जिल्हाध्यक्षपदासाठी 17, उत्तरेसाठी 14, तर शहर जिल्हाध्यक्षपदासाठी आठ जण इच्छुक होते. बागडे यांनी कार्यकर्त्यांना माघार घेण्यासाठी विनंतीही केली; परंतु एखादा अपवाद वगळता कोणीही माघार घेण्यास तयार नव्हते. एकमत न झाल्याने प्रत्यक्ष मुलाखती घेण्याचा निर्णय घेतला. एक-एक करीत मुलाखतीही घेतल्या. मुलाखतीत मीच कसा सरस आहे, हे सांगण्यासाठी उमेदवारांची चढाओढ सुरू होती. काहीही झाले, तरी आता माघार नाही, असा चंग बांधून कार्यकर्ते जिद्दीला पेटले होते. त्यामुळे बागडेही हतबल झाले. कोअर कमिटीशी चर्चा करून अखेर निवडीचा चेंडू प्रदेशाध्यक्षांच्या कोर्टात टाकून ते मोकळे झाले. 

जिल्ह्याला तीन जिल्हाध्यक्ष मिळणार, ही कार्यकर्त्यांची आशाही मावळली. भाजप जिल्हाध्यक्षपद निवडीसाठी राज्यात काही ठिकाणी राडा झाला. त्यामुळे त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी येथील निवड लांबणीवर गेल्याची चर्चा होती. 

कार्यक्रमात बेशिस्तीचे प्रदर्शन

जिल्हाध्यक्षपदासाठी निवडीचा कार्यक्रम सुरू असताना, भाजपचा एक नेता आला. दुसऱ्या नेत्याने त्यास गेटसमोरच गाठले. दिलेल्या कर्जाची परतफेड करण्याबाबत विचारणा केली असता, दोघांत बाचाबाची सुरू झाली. ते पाहून पहिल्या नेत्यांचे कार्यकर्ते धावले. दुसऱ्या नेत्याला बाजूला घेत दमदाटी सुरू केली. प्रसंगावधान राखत दुसरा नेत्याने कार्यक्रमाकडे धाव घेतली. त्यामुळे कार्यक्रमात काही वेळ गोंधळ झाला. कायम शिस्तीचे धडे देणाऱ्या भाजपचे नेते स्वतः मात्र बेशिस्तीचे प्रदर्शन करताना पाहून एकच चर्चा रंगली होती. 

जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार 

दक्षिण नगर 
सुनील पाखरे, साहेबराव म्हसे, संतोष लगड, दिलीप भालसिंग, रवींद्र कडूस, सुभाष गायकवाड, अशोक चोरमले, शांतीलाल कोपनर, राहुल कारखिले, भानुदास बेरड, विश्‍वनाथ कोरडे, दत्ता हिरनावळे, युवराज पोटे, स्वप्नील देसाई, नामदेव राऊत, अरुण मुंढे, बाळासाहेब पोटघन. 

उत्तर नगर 
विठ्ठल शिंदे, शिवाजी धुमाळ, राजेंद्र देशमुख, भरत फटांगरे, भानुदास डेरे, हरिभाऊ चकोर, राजेश चौधरी, नितीन जोशी, राजेंद्र गोंदकर, नितीन कापसे, प्रकाश चित्ते, जालिंदर वाकचौरे, शिवाजी गोंदकर, बाळासाहेब मुरकुटे. 

नगर शहर 
जगन्नाथ निंबाळकर, सचिन पारखी, दामोदर बठेजा, मनेष साठे, विनोद भिंगारे, सुवेंद्र गांधी, बंटी डापसे, भय्या गंधे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Police: पुण्यात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? मद्यपींकडून पोलिसांनाच धक्काबुक्की

Latest Marathi News Live Update : द्राक्षबागेची बिकट अवस्था पाहून उगाव येथील प्रगतिशील शेतकऱ्याची आत्महत्या

Air India Flight: दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात अचानक बिघाड; मंगोलियात इमर्जन्सी लँडिंग

Women's World Cup: पाकिस्तानची जर्सी घालून भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकण्यासाठी फुल सपोर्ट; चाहत्याचा Video Viral

Mumbai Airport: महत्त्वाची बातमी! मुंबई विमानतळाच्या दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार; का अन् कधी? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT