BPO Center Run By Educated Prisoner In Hindalga Jail 
पश्चिम महाराष्ट्र

कैदी चालविणार आता "बीपीओ' केंद्र 

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - हिंडलगा कारागृहातील कैद्यांना नेहमीच स्वयंरोजगाराचे धडे दिले जातात. आता शिक्षित कैद्यांसाठी कारागृह प्रशासनाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. शिक्षित कैद्यांना माहिती-तंत्रज्ञानचे प्रशिक्षण देण्यासाठी कारागृहात व्यवसाय प्रक्रिया आऊटसोर्सिंग (बीपीओ) केंद्र पुढील आठवड्यापासून सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून 30 ते 35 संगणक बसविण्यात येणार आहेत. 

मध्यवर्ती केंद्र कारागृहे तसेच उपकारागृहांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. बंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहानंतर बेळगातील हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाला राज्यातील दुसरे अतिसुरक्षित कारागृह म्हणून ओळखले जाते. कारागृहात साध्या कैद्यांसह अनेक कुख्यात कैदी बंदिस्त आहेत. त्यामध्ये अशिक्षित आणि सुशिक्षित कैद्यांचा समावेश आहे. शिक्षा भोगून कारागृहातून बाहेर पडल्यानंतर कैदी स्वत:च्या पायावर उभा रहावेत, स्वत:चा व्यवसाय सुरु करावा, यासाठी कैद्यांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाते. अशिक्षित कैद्यांसाठी विशेषकरुन बेकरी पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते, तर शिक्षित कैद्यांना आता माहिती-तंत्रज्ञान कर्मचारी अर्थात आयटी इम्पलॉईज बनविण्याचा निर्णय घेतला आहे. 

बंगळूरनंतर आता हिंडलगा कारागृहात

बंगळूरनंतर हिंडलगा कारागृहामध्ये अशा प्रकारचे सुरु केले जाणारे हे दुसरे व्यवसाय प्रक्रिया आऊटसोर्सिंग (बीपीओ) केंद्र असेल. निवडक कैद्यांना माहिती तंत्रज्ञान कर्मचारी बनविण्यासाठीची सर्व तयारी कारागृह प्रशासनाने केली आहे. व्यवसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) प्रकल्पांतर्गत संबंधित कैद्यांची आयटी प्रशिक्षणासाठी निवड होणार आहे. बंगळूर येथील माहिती व तंत्रज्ञान कंपनी माईंड ट्री कडून संबंधित कैद्यांची निवड केली जाऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या कैद्यांना दरमहा भत्ताही दिला जाईल. बंगळूर मध्यवर्ती कारागृहातील बीपीओ युनिट ज्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केले ते माईंड ट्री कंपनीचे सरव्यवस्थापक अब्राहम मोझेस यांच्याच मार्गदर्शनाखाली हिंडलगा कारागृहातील युनिटची उभारणी केली जाणार आहे. 

कैद्यांमध्ये सकारात्मक बदलासाठी पाऊल

हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातीची क्षमता साडेअकराशे कैदी राहतील अशी आहे. सध्या एक हजार कैदी बंदिस्त आहेत. त्यापैकी बहुतांश कैदी शिक्षित आहेत. माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण बीपीओ केंद्रातून देण्यात येणार आहे. केंद्राला कडक सुरक्षा व्यवस्था पुरवली जाणार आहे. याव्दारे कैद्यांमध्ये सकारात्मक बदल होण्यास मदत होईल. 
- कृष्णकुमार, मुख्य अधीक्षक, हिंडलगा मध्यवर्ती कारागृह  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Puja Khedkar: दिलीप खेडकर, मनोरमा खेडकर कुठे गायब? घरात आले जेवणाचे दोन डबे; नेमका प्रकार काय?

IND vs PAK, Asia Cup: 'पाकिस्तान नाही, पोपटवाडी संघ', गावसकर भारताच्या विजयनंतर थेटच बोलले

Viral Video : तरुणीने क्षणात संपविले जीवन; लोकांनी खूप समजावलं पण कोणाचंच ऐकलं नाही, हृदयद्रावक व्हिडिओ

Education News : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल: आता ५२ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सर्व शिक्षकांना द्यावी लागणार ‘टीईटी’ परीक्षा

Ghati Hospital: एमडी एमएस’च्या ८५ जागा वाढणार; ‘घाटी’त रुग्णसेवेला मिळेल बळकटी, तज्ज्ञ होण्याची संधी

SCROLL FOR NEXT