पश्चिम महाराष्ट्र

Coronavirus : ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर ट्रस्ट सरसावले; 50 लाखांचा निधी जमा

फिरोज तांबोळी

गोंदवले (जि.सातारा) : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाने देशात जनतेस अनेक अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. यासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर गोंदवले बुद्रुक येथील श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर ट्रस्टच्या वतीने पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीमध्ये पन्नास लाख रुपये आज (शुक्रवार) जमा करण्यात आल्याची माहिती समाधी मंदिर समितीच्या विश्वस्तांनी दिली.

श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा गरजूंना मदतीचा वारसा येथील समाधी मंदिर समिती अविरतपणे पुढे चालवत आहे.श्री महाराजानी दिलेल्या श्रीराम नामाच्या शिकवणी बरोबरच भुकेलेल्याना अन्न,गोरक्षण तसेच रुग्णांची सेवेचा वारसा देखील येथे आजही सुरू आहे.श्री महाराजांनीही ऐन दुष्काळात लोकांच्या हाताला काम देऊन आधार दिला होता. याशिवाय अनेक संकटात लोकांच्या मदतीला श्री महाराज धावून जात.हीच परंपरा समाधी मंदिर समितीने सुरू ठेवली आहे.

सध्या सुरू असलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरात उपाययोजना सुरू आहेत.याकामी मानवतेच्या भावनेतून आपणही मदत करावी याबाबत समाधी मंदिर समितीने विचारविनिमय करण्यात आला आणि तात्काळ यासाठी मान्यता देण्यात आली.समितीच्या वतीने पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीत पन्नास लाख रुपये जमा करण्यात आले.

Coronavirus : साताऱ्यातील सव्वा वर्षाचा बालकासह युवकाचा रिपाेर्ट निगेटिव्ह

पोलिस फक्त काट्याच मारत नाहीत... 

सॉरी उद्धवजी...अभिनेत्याने मागितली ठाकरेंची जाहीर माफी

केळघरमध्ये सरपंच स्वतः फिरुन करताहेत काेराेनाबाबतची जागृती

केळघर (जि.सातारा) : केळघर ( ता. जावळी) गावचे सरपंच रविंद्र सल्लक हे गेले आठ दिवसांपासून स्वत:च्या चारचाकी गाडीला ध्वनीक्षेपक लावून कोरोनाच्या संकटापासून सारख्या आजारापासून जनतेने सावधानता बाळगावी यासाठी गल्ली गल्लीत जनजागृती करत फिरत आहेत.

गेले काही दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने प्रशासनाने शहराबरोबरच खेडयोपाड्यातही याबाबत नागरिकांनी घ्यावयाची काळजी व विनाकारण गर्दी करू नये. याबाबतच्या सूचना येथील सरपंच रविंद्र सल्लक स्वत: हातात माईक घेत देत गल्ली -गल्लीत फिरत आहेत. बाजारपेठेतील भाजीपाला ,किराणा दुकान , मेडिकल दुकानदारांच्या समोर चौकोन आखून देत गर्दी न करता ,खबरदारी घेत जीवनावश्यक वस्तूची खरेदी करावी . तसेच बाजारपेठेत विनाकारण युवकांनी फिरु नये. घरातच बसावे अशा सूचना देत ते केळघर नांदगणेसह परिसरातील गावांमध्ये दररोज जनजागृती करत प्रशासनास सहकार्य करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : २०१६ला नीटचा पेपर फुटला तेव्हा PM मोदींना कॉल केलेला; राज ठाकरे काय म्हणाले?

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत मोठा निर्णय! मूळ ढाच्याला बाधा न आणता काम करण्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे 'पुरातत्त्व'ला निर्देश

Bhiwandi Building Collapse: ढिगाऱ्यातही जिवंत राहिली आईची माया, भिवंडी दुर्घटनेतील 'त्या' प्रसंगाने सर्वांचे डोळे पाणावले; काय घडलं?

Army Major Accident : उंटाला धडकली आर्मी मेजरची भरधाव कार, महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या मेजरचा जागीच मृत्यू, दोन लेफ्टनंट गंभीर जखमी

R. Ashwin: भुवीला पुनरागमनाचा सल्ला, वैभव सूर्यवंशीला डच्चू! 2027 वर्ल्ड कपसाठी अश्विनचा BCCI ला मोठा सल्ला; पाहा कोण IN, कोण OUT

SCROLL FOR NEXT