पश्चिम महाराष्ट्र

ब्रम्हनाळच्या बोट दुर्घटनेतील मृतांचे दागिने, रोख रक्कम सापडली

सकाळ वृत्तसेवा

भिलवडी - ब्रम्हनाळ (ता. पलूस) येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचे सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कम असा 7 लाख 28 हजारांचा मुद्देमाल सापडला आहे. भिलवडी पोलीसांनी पंचनामा करून तो नातेवाईकांकडे सुपुर्द केला. 

कृष्णा नदीच्या प्रलंयकारी महापुरात ब्रम्हनाळचे पूरग्रस्त आठ ऑगष्ट रोजी खासगी होडीतून बाहेर पडत असताना दुर्घटना घडली. 17 लोकांचा मृत्यू झाला. तीसहून अधिक लोक होडीत बसले होते. महापुरातून बाहेर पडताना त्यांनी दागिने, पैसे सोबत घेतल्याची माहिती नातेवाईकांनी भिलवडी पोलीसांत दिली होती. पूर ओसल्यानंतर परिसरात पोलीसांचा बंदोबस्त होता. काल सकाळी घटनास्थळी पोलिसांनी मुद्देमालाची शोधमोहिम सुरु झाली. दुपारी दीड वाजता घटनास्थळी 6 लाख 10 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे 20 ग्रॅमचे दागिने, चांदीचे 20 हजार रूपये किंमतीचे 847 ग्रॅम दागिने, 98 हजार 335 रूपये रोख रक्कम असा एकूण 7 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल ऊसाच्या शेतात सापडला. 

मृतांचे नातेवाईक, पोलीस पाटील, सरपंचांचे समक्ष पोलीसांनी पंचनामा केला. मुद्देमाल नातेवाईकांकडे सुपुर्द केला. ही मोहिम भिलवडी ठाण्याचे सहाय्यक निरिक्षक सुनील हारूगडे, उपनिरिक्षक नंदकुमार कदम, कर्मचारी अतुल माळी, श्री. सुर्यवंशी, राकेश पांढरे, चंद्रकांत कोळी यांनी राबवली. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT