corona.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

ब्रेकिंग : कर्नाळच्या तरूणाला "कोरोना' ची लागण : जिल्ह्यातील संख्या 7 वर

सकाळवृत्तसेवा

सांगली- जिल्ह्यात दोन दिवसात "कोरोना' बाधित तीन रूग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली असतानाच आज सायंकाळी कर्नाळ (ता. मिरज) येथील 30 वर्षीय तरूणास "कोरोना' झाल्याचे निदान झाले. सदर कोरोना बाधित तरूण सातारा येथे आजीचे निधन झाल्यामुळे तेथे गेली होती. सातारा येथील घरात एकाला कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यामुळे कर्नाळच्या व्यक्ती "कोरोना' बाधित झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता सातवर पोहोचली आहे. 


कर्नाळ येथे राहणाऱ्या एकाची आजी मृत झाल्यामुळे तो सातारा येथे गेला होता. सातारा येथे त्याचे मावसभाऊ मुंबईतून आले होते. सातारा येथील घरात एकास कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यानंतर कर्नाळ (ता. मिरज) येथील एकजण येऊन गेल्याचे समजले. त्यामुळे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शनिवारी (ता.2) जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांना कळवले. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने तरूणास मिरजेतील आयसोलेशन कक्षात दाखल केले. सदर तरूणास कोरोना ची कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र खबरदारी म्हणून त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला. त्याचा अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला. तो "पॉझिटीव्ह' असल्याचे निष्पन्न झाले. अहवालानंतर प्रशासनाच्यावतीने कर्नाळ गावातील रूग्णाचे नातेवाईक आणि संपर्कातील व्यक्तींचा सायंकाळपासून शोध घेतला जात आहे. 


दरम्यान रविवारपर्यंत दुधेभावी येथील पती-पत्नी आणि कुपवाडमधील नातेवाईक युवती अशा तीन रूग्णांची भर पडल्यामुळे कोरोना बाधित रूग्णांची संख्या सहा झाली होती. त्यात कर्नाळच्या रूग्णाची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील रूग्णांची संख्या सातवर पोहोचली आहे. 
मुंबईहून दुधेभावी (ता. कवठेमहांकाळ) येथे आलेल्या व्यक्तीस आणि त्याच्या पत्नी "कोरोना' बाधित असल्याचे दोन दिवसापूर्वी स्पष्ट झाले होते. त्यानंतर कुपवाडमधील वाघमोडेनगरमध्ये राहणाऱ्या मेहुणीच्या मुलगीस देखील कोरोना झाल्याचे शनिवारी (ता.2) स्पष्ट झाले. त्यानंतर वाघमोडेनगर परिसर "सील' करण्यात आला. युवतीच्या कुटुंबातील तिघेजण "आयसोलेशन' कक्षात आहेत. तसेच कुटुंबाच्या संपर्कातील 31 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. या एकुण 34 जणांच्या "स्वॅब' चे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. या सर्व अहवालाकडे लक्ष लागले आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत अहवाल येतील असे सांगण्यात आले होते. 


जिल्ह्यात सद्यस्थितीत "कोरोना' बाधित सात रूग्ण आहेत. त्यापैकी दोघे निगडी (ता. शिराळा) येथील तर कामेरी (ता. वाळवा) येथील एक 94 वर्षीय वृद्धा आहे. तसेच मुंबईहून दुधेभावी येथे आलेला रूग्ण, त्याची पत्नी आणि कुपवाड येथील मेहुणीची मुलगी असे अन्य तिघेजण आहेत. या सहाजणांसह कर्नाळ रूग्ण धरून सातजण मिरजेतील "आयसोलेशन' कक्षात सध्या उपचार घेत आहेत. या सात जणांची प्रकृती स्थिर असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले. जिल्ह्यातील कोरोना रूग्णाची सद्यस्थिती बघितली तर आतापर्यंत एकुण 34 जणांचा अहवाल "पॉझिटीव्ह' आला आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. तर 26 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. उर्वरीत सात रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Bar Strike : मद्यपींसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरातील बार उद्या राहणार बंद; HRAWI चा जाहीर पाठिंबा, काय आहे कारण?

Kolhapur : ए. एस. ट्रेडर्सच्या माध्यमातून कोल्हापूर व बेळगावातील गोरगरिबांना लुटायचा, पोलिसांनी ट्रॅप लावून मुख्य एजंटला केली अटक

Flight Cancellation:'तांत्रिक कारणामुळे गोव्यातून विमानाचे उड्डाण रद्द'; ५९ प्रवासी सोलापूर विमानतळावरून परतले; नाईट लॅंडिंग नसल्याने गैरसोय

Latest Marathi News Updates : मराठीबहुल मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना भेटणार; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा निर्णय

Solapur: गावगाड्याच्या राजकारणाचा उडणार ‘धुरळा’; सोमवारी झेडपीची प्रारूप प्रभागरचना, मंगळवारी सरपंचाची आरक्षण सोडत

SCROLL FOR NEXT