नगर : विवाहित दाम्पत्याला विवस्त्र करून त्यांच्या अंगावर रॉकेल ओतल्याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासात गुन्ह्याला वेगळे वळण लागले. या प्रकरणातील नागडेपणा पोलिसांनी शोधून काढला.
अधिक माहिती अशी, सन 2016 मध्ये सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेल्या एका महिलेने तिच्या पतीसह अंगावर पेट्रोल ओतून विवस्त्रावस्थेत मारहाण केल्याचे म्हटले होतं. त्या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिचा सख्खा भाऊ, दीर, चुलत सासरे या नातेवाईकांसह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून पोलिसांना या बाबत शंका होती. त्यादृष्टीने प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक हारूण मुलानी यांनी विशेष पथके करून तपास सुरू केला.
हेही वाचा - डरायचं नाही आता लढायचं, पिचड म्हणाले
गुन्ह्याचा तांत्रिक तपास करून पोलिसांनी कटात सहभागी असलेल्या अन्य तीन लोकांना ताब्यात घेत्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला. त्या तिघांनाही न्यायालयासमोर हजर करून 164 जबाब घेतले.
शहरातील एका बंद पडलेल्या शाळेच्या खोलीमध्ये पती-पत्नीने विवस्त्र होऊन अंगावर रॉकेल ओतून घेतले आणि अन्य आरोपींनी व्हिडिओ शुटिंग करून मारहाण केल्याचा बनाव केला, असा तपासात निष्पन्न झाल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या महिलेच्या पतीसह चौघांन ताब्यात घेतले आहे.
अन् तिने घेतले विष!
दरम्यान, व्हिडिओ शुटिंग करणाऱ्या तिघांनी दिलेल्या माहितीवरून सर्व घटनाक्रम उघडकीस आला. त्यानुसार पोलिसांनी त्या महिलेच्या पतीला ताब्यात घेतले. त्यानंतर त्या फिर्यादी महिलेने मध्यरात्री राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सर्व बनाव उघडकीस आल्यानंतर बदनामीच्या भीतीने तिने हे कृत्य केले असावे, असे बोलले जात आहे. तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
"तांत्रिक पुराव्या'मुळे खरा प्रकार समोर
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील मोबाईल सेलमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ व्हायरल प्रकरण अत्यंत पद्धतीशीरपणे हाताळले. अत्यंत सूक्ष्म तपास करून खरा प्रकार उघडकीस आणला. कट रचून कशा प्रकारे गुन्हा केल्याचे याचे पुरावे जुळवून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.
विधानसभेत गाजले प्रकरण
दाम्पत्याला विवस्त्र करीत त्यांच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने हे प्रकरण राज्यभर गाजले. त्याची विधानसभेत चर्चा झाली. विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. या प्रकरणी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे यांनीही नगरला येऊन तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी कसून तपास करून घटनेतील सत्यता समोर आणली.
पैशांसाठी केला बनाव
पीडित दाम्पत्याने पैसे आणि मिळकतीसाठी हा बनाव केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिस फिर्यादी होण्याची शक्यता आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.