The bride to be at the police door before the wedding 
पश्चिम महाराष्ट्र

वधू-वराची लग्नाआधीच वरात पण पोलिसांच्या दारात, असं काय घडलं...

सकाळ वृत्तसेवा

पाथर्डी ः लॉकडाउन असल्याने सर्वत्र बंद पाळला जात आहे. कंपन्याही बंद आहेत. मात्र काही लोकांना याचं काही देणंघेणं नाही. ते आपल्या घरात सोहळा कसा करायचा याच्या तयारीत मग्न आहेत. पाथर्डी शहरात असेच घडले. 

लग्नाचा बस्ता खरेदीसाठी वधू आणि वराकडील मंडळी आली होती.वर-वरही जातीने हजर होते. आपापल्या पसंतीने त्यांना कपडे घ्यायचे होते. एकमेकांची पसंती लक्षात घेऊन खरेदी जोमात सुरू होती. मात्र, तेवढ्यात उलटं घडलं. समोर पोलिस उभे राहिलेल पाहून सगळ्यांचीच फे फे उडाली. मग वधू-वरासह सगळ्यांचीच वरात पोलिस ठाण्यात गेली.

पोलिसांना माहीती मिळाल्याने दुकानदार, दोन कामगार व बस्त्यासाठी आलेले पंधराजण असे एकुन अठराजणांना पोलिस थेट पोलिस ठाण्यात घेवुन गेले .गुन्हा दाखल करुन संबधितांना ताब्यात घेतले.  

पाथर्डी शहरातील मेनरोडवरील श्रीराम कलेक्शन हे कापडाचे दुकान आहे. दुकानाचा मालक आनंद मारुती फासे याने शेकटे व मोहटे येथील नागरीकांना लग्नाचे कपडे खरेदीसाठी बोलावून घेतले. सोमवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास श्रीराम कलेक्शन येथे लग्नाचा बस्ता चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या दुकानावर छापा टाकला. तेव्हा दुकानदार आनंद फासे, कामगार इंद्रजीत टेमकर, संदिप लगारे हे तिघेजण आणि बस्त्यासाठी आलेले शंकर दहीफळे,शिवाजी दहीफळे,शेषराव पालवे, पोपट दहीफळे, जालिंदर दहीफळे, गणेश दहीफळे,राजेंद्र दहीफळे,पप्पु दहीफळे ,मंगल दहीफळे सर्व राहणार मोहटे, दत्तात्रय घुले, गहिनीनाथ घुले, बाळु नाथा घुले, राजेंद्र घुले, स्वाती घुले (रा. शेकटे) हे दुकानात आढळून आले.

कपडे खरेदी करताना व विकताना वरील लोकांनी कोरोना रोगाच्या उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले.भारतीय साथरोग अधिनियम १८९७ चे कलम ३,४,५ आपत्ती व्यवस्थापन कायमदा कलम ५१ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोलिस काँ. जे.बी.बांगर यांनी फिर्याद नोंदविली आहे. वरील सर्वांना ताब्यात घेतले आहे. लग्नाचा बस्ता बांधताना वधु-वरासह त्यांचे वडील आणि नातेवाईक थेट पोलिस ठाण्यात पोहचले. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर शासन विविध उपाययोजना करीत आहे. नागरीक मात्र त्यांचे दैनदिन कोणतेही काम सोडायला तयार नाहीत.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : 'कॅप्टन खरात फाईल्स' मध्ये खळबळजनक खुलासा! सीसीटीव्ही रेकॉर्डिंग ठरले मुख्य पुरावा; एसआयटीकडून नीरज जाधवचा शोध सुरू

Pune News: पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागातील विकास ‘व्हेंटिलेटर’वर; जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील आदिवासी बांधव सोयीसुविधांपासून वंंचित!

‘धुरंधर 2’ ची एंट्री अन् मिम्सचा जल्लोष! सोशल मीडियावर भन्नाट रिअ‍ॅक्शन व्हायरल

CET Cell Exam: सीईटी परिक्षेत मोठा बदल, यंदा विद्यार्थ्यांना दोन हॉल तिकीटं मिळणार, कारण काय?

Latest Marathi News Live Update : कॅप्टन खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव अजूनही फरार

SCROLL FOR NEXT