zp sangli 
पश्चिम महाराष्ट्र

वसंतदादांच्या नावाचा बंगला पाडणार... कुठे? 

सकाळवृत्तसेवा

सांगली, ता. 22 ः जिल्हा परिषद अध्यक्षांच्या "वसंत' बंगल्यासह जलस्वराज्य विभागाची जागा आणि मिरज मार्केट यार्डमधील मालकीची मोकळी जागा विकसित करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. त्यासाठी वास्तू विशारदांकडून आराखडा मागवण्याचा निर्णय आज अध्यक्ष व सभापतींच्या बैठकीत घेण्यात आला. या जागा स्वनिधीतून विकसीत करव्यात, असे प्राथमिक नियोजन आहे. त्याला सर्वसाधारण सभेत मांडण्याआधी संपूर्ण अभ्यास केला जाणार आहे. अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांनी ही माहिती दिली. 


जिल्हा परिषदेच्या जिल्हाभरात अनेक ठिकाणी रिकाम्या जागा आहेत. त्या ताब्यात घेऊन विकसीत कराव्यात, असा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत झाला. त्याआधीपासूनच या जागांबाबत चर्चा सुरु झाली होती. जिल्हा परिषदेसमोरील जलस्वराज्यच्या इमारतीची मोठी व मोक्‍याची जागा विकसीत करण्याबाबत याआधी अनेकदा चर्चा झाली. आताही त्यावर खल सुरु होणार आहे. अध्यक्षांच्या बंगल्याचा विषय पहिल्यांदा चर्चेला आला आहे. यासोबत मिरज मार्केट यार्ड येथील मोकळ्या जागेवरही कॉम्प्लेक्‍स उभारणीचा विषय पुढे आला आहे. 


श्री. कोरे म्हणाल्या, ""या तीन जागा विकसीत करण्याबाबत आज बैठक झाली. त्याला सभापतींसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते. अनुपस्थितीत सभापतींना फोनवरून माहिती देण्यात आली. जागा विकसीत करण्यासाठी वास्तू विशारदांकडून आराखडा मागवला जाईल. स्वीय निधीतून हा विकास करावा आणि उत्पन्नाची साधने वाढवावीत, असा प्रयत्न असणार आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हा परिषदांनी हा प्रयोग केला असून तो यशस्वी झाला आहे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hyderabad Gazette : मराठा समाजाला दिलासा! ‘हैदराबाद गॅझेट’ विरोधातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

Girl Period Problems: बाहेरून मुलगी, आतून मुलगा? १७ वर्षांची झाली तरी पीरियड्स आले नाही म्हणून तपासणी केली अन् सत्य आलं समोर

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

'एक दिवाने की दिवानियत' चित्रपटाच्या डबिंगदरम्यान रडला हर्षवर्धन राणे

Latest Maharashtra News Updates : गोंदियाच्या उच्चेपूर गावात सुरू होणाऱ्या बिअर बारला ग्रामस्थांचा विरोध

SCROLL FOR NEXT