Burn 80 acres of trees; Fire at Dandoba Sanctuary 
पश्चिम महाराष्ट्र

80 एकरांतील झाडे जळून खाक; दंडोबा डोंगराला आग

प्रमोद जेरे

मिरज (जि. सांगली)  : तालुक्‍यातील भोसेच्या हद्दीत दंडोबा डोंगराला आग लागली. ऐंशी एकरातील गवत, हजारो झाडे जळून खाक झाली. अभयारण्याशेजारील शेतकरी, ग्रामस्थ, पंचायत समिती सदस्य कृष्णदेव कांबळे यांनी आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. पाच-सहा तासांनंतर आग आटोक्‍यात आणण्यास थोडे यश आले. सायंकाळपर्यंत काही ठिकाणी धुराचे लोट दिसत होते.

अभयारण्यात शनिवारी सायंकाळी उशिरा आग लागली असावी, असा अंदाज आहे. 40 ते 50 एकरांहून अधिक क्षेत्र जळाल्यानंतर ग्रामस्थ, शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने हिरवी झुडपे हातात घेऊन तिन्ही बाजूंनी आग विझवणे सुरू केले. आगीचा लोळ, अपुऱ्या मनुष्यबळामुळे आग विझवण्यात अडथळे आले. 

आगीत 80 एकरांहून अधिक क्षेत्रातील गवत, मोठी झाडे जळून खाक झालीत. मोठी झाडे, तर हजारो मध्यम आकाराच्या झाडांचा त्यात समावेश आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना आग लागल्याचे उशिरा समजले. चार-दोन कर्मचारीच तेथे उपस्थित असल्याने त्यांनीही आग विझवण्याचा प्रयत्न केला. 

आगीचे कारण अस्पष्ट 
दंडोबा अभयारण्यातील उपद्रवींचा वावर अजून कमी झालेला नाही. ही आग नेमकी कशी लागली, याचा अंदाजही आलेला नाही. आगीत झालेले नुकसान पाहता दंडोबा अभयारण्याची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करणे गरजेचे आहे. 

आगीची सखोल चौकशी झाली पाहिजे

दंडोबा डोंगराची कष्टपूर्वक, कोट्यवधी रुपये खर्चून जपणूक केलीआहे. वनसंपदा जपणे सर्वांचेच कर्तव्य आहे, परंतु सुरक्षाव्यवस्थेत त्रुटी आहेत. वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले जाते. आजच्या आगीची सखोल चौकशी झाली पाहिजे. 
- कृष्णदेव कांबळे, सदस्य, पंचायत समिती. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB चा फलंदाज Unstoppable ! १४ चेंडूंत ६४ धावा कुटून संघाला मिळवून दिला दणदणीत विजय; KKR ला होतोय पश्चाताप

Latest Maharashtra News Updates : मराठा आरक्षणावरील जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर डबल बेड मॅट्रेस अन् सोफ्यासह दुरुस्तीचा खर्च तब्बल ४० लाख; इतकी उधळपट्टी कशाला? विरोधकांचा सवाल

Gemini Photo Trend : गुगल जेमिनीवर तुम्ही फोटो बनवताय, पण त्या फोटोचे पुढे काय होते? खरंच यामुळे डेटा लिक होतो का..जाणून घ्या सत्य

Maruti car price cut : दसरा, दिवाळीच्या आधी ‘मारूती’चा बडा धमका! कारच्या किंमतींमध्ये मोठी कपात जाहीर

SCROLL FOR NEXT