bus service for special location like aurangabad kolhapur increased for passengers in maharashtra from nipani
bus service for special location like aurangabad kolhapur increased for passengers in maharashtra from nipani 
पश्चिम महाराष्ट्र

दीपावलीनिमित्तमहाराष्ट्रात तासाला बससेवा ; विविध मार्गांसाठी 25 बसेस राखीव

सकाळ वृत्तसेवा

निपाणी : दिवाळीला वसुबारसने गुरुवार (12) पासून प्रारंभ झाला. त्या पार्श्वभूमीवर निपाणी आगारातून मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, शिर्डीसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी जादा बससेवा सुरु केली आहे. या मार्गासाठी 25 बसेस राखीव ठेवल्या आहेत. त्यामुळे दिवाळी सणात माहेरवासिनींसह प्रवाशांची सोय होणार आहे. प्रत्येक तासाला ही बससेवा असून प्रवासी वाढल्यास आणखी जादा बस सोडण्याचे नियोजन आहे. त्याचा फायदा प्रवाशांसह आगाराला होणार आहे. 

दिवाळीसाठी कनार्टक, महाराष्ट्रातून प्रवाशांची जास्त ये-जा असते. त्यामुळे बससेना गर्दी असते. ठराविकच बस असल्याने प्रवाशांना बस पकडण्यासाठी कसरत करावी लागते. त्यामुळे लहान मुलांसह महिलांचे हाल होत. त्याची दखल घेत निपाणी आगाराने यंदा जादा बससेवा सुरु केली आहे. शुक्रवार (13) पासून या मार्गावर जादा बस धावणार असल्याचे आगारातील सूत्रांनी सांगितले. गुरुवारी (12) निपाणी आगारातर्फे त्याचे नियोजन सुरु होते. 

कोरोनाकाळात बस प्रवासाकडे नागरिकांनी पाठ फिरविली होती. त्याचा चांगलाच फटका महामंडळाला बसला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतनही महामंडळाला तडजोड करून उशिरा द्यावे लागले. सध्या बसकडे प्रवासी आकर्षित होत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासह विविध उपाययोजना करून प्रवाशांची सोय केली जात आहे. तसेच जनजागृतीही केली जात आहे. त्यामुळे नुकसान दिवाळी सणात थोड्याफार प्रमाणात झालेले भरून निघण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

हेही वाचा - बचत गटाच्या नावाखाली पैसे गोळा करत महिलांची फसवणूक करणाऱ्या बंटी-बबलीला केले जेरबंद -
 
सध्या दिवाळीला प्रारंभ झाला आहे. प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबई, पुणेसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी जादा बसेस सोडल्या आहेत. त्याचा लाभ प्रवाशांसह आगाराला होणार आहे. 
- मंजुनाथ हडपद, व्यवस्थापक, निपाणी आगार 

दृष्टिक्षेपात जादा बससेवा

- महाराष्ट्रासाई 20 राखीव बस. 
- या मार्गासाठी 45 चालक-वाहकांची तरतूद. 
- दिवसाकाठी 3 लाख उत्पन्न अपेक्षित. 
- कोरोनातील नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न  

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

RTE Admission : आरटीईनुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाचे अर्ज भरण्याची प्रक्रिया तात्पुरती बंद

SRH vs LSG Live Score : पूरन अन् बदोनीनं लखनौला पोहचवलं 165 धावांपर्यंत

SCROLL FOR NEXT