Car Fall In Chitri Dam Project Teacher Death
Car Fall In Chitri Dam Project Teacher Death 
पश्चिम महाराष्ट्र

चित्री प्रकल्पात मोटार कोसळली अन्...

सकाळ वृत्तसेवा

आजरा ( कोल्हापूर ) - चित्री येथील प्रकल्पात मोटार कोसळून प्राथमिक शिक्षकाचा मृत्यू झाला. आप्पासाहेब ऊर्फ प्रकाश ईश्‍वर शिंदे (वय 48 रा. महागाव ता. गडहिंग्लज) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. आज दुपारी 12 च्या सुमारास मोटार सुरू करत असताना चालक शिंदे यांचा ताबा सुटल्याने अपघात घडला. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर मोटार व मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात पोलिस आणि स्थानिकांना यश आले. अशोक शिंदे यांनी फिर्याद दिली. 

आप्पासाहेब हे भावाचा मुलगा अथर्व शिंदे (10) व शेजारील सौरव टक्केकर (14) यांना सोबत घेऊन आज रविवार सुटीचा दिवस असल्याने मोटारीने (एमएच 01-जी ए 5992) चित्री प्रकल्पावर पर्यटनासाठी गेले होते. ते चित्रीच्या बॅक वॉटरच्या बाजूने आवंडी धनगरवाड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर धरणापासून पाचशे मीटर अंतरावर त्यांची मोटार बंद पडली. त्यांनी मोटारीतील अथर्व व सौरभ यांना खाली उतरून समोरील बाजूला धक्का मारण्यास सांगितले. या वेळी मोटार अचानकपणे सुरू झाली. चालक शिंदे यांचा मोटारीवरील ताबा सुटला व मोटार थेट वीस फूट खोल पाण्यात कोसळून उलटली. अथर्व व सौरभ यांनी आरडा ओरड केल्यावर उपस्थित पर्यटकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या दोघांनी घरी भ्रमणध्वनीवरून अपघाताची माहिती घरच्यांना दिली.

गुदमरून मृत्यू

दरम्यान, पोलिस निरीक्षक बालाजी भांगे पथकासह घटनास्थळी पोचले. बोटीद्वारे पाण्यात मोटारीचा शोध घेतला. मोटारीला बांधून ट्रॅक्‍टरने ग्रामस्थांनी पाण्याबाहेर काढली. शिंदे यांना मोटारमधून बाहेर पडता न आल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. आप्पासाहेब हे उंबरवाडी येथील शाळेत शिक्षक होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी व वडील असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच महागाव परिसरात शोककळा पसरली. शांत व मनमिळावू स्वभावाचे असल्याने घटनास्थळावर मित्रपरिवाराची मोठी गर्दी झाली होती. सहायक पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग दोरुगडे अधिक तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT