At the center of public participation in village management 
पश्चिम महाराष्ट्र

गाव कारभारी लईभारी : गाव कारभारात लोकसहभाग केंद्रस्थानी

अजित झळके

सांगली : गाव कारभार चालवताना निवडून दिलेल्या सदस्यांवर संपूर्ण जबाबदारी देणं आणि झालेल्या प्रत्येक गोष्टीला त्यांना जबाबदार धरणे चुकीचं आहे. या प्रक्रियेत लोकांचा थेट सहभाग जितका अधिक तितका गावकारभार चांगला, पारदर्शी आणि विकासाला गती देणारा ठरतो, असे अनेक गावांनी सिद्ध करून दाखवलेय. जिथे वाद, तिथे अधोगती हेच सूत्र राहिले.

ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी निवडणे, पॅनेल तयार करणे, प्रचार करणे, मतदान आणि निकाल ही प्रक्रिया पार पडते. ती सुरु आहे, तोवर गाव वैचारिक मतभेद, प्रचाराने तापलेले असते. ती प्रक्रिया एकदा पार पडली, की निवडून आलेल्या प्रत्येकाने "मी गावचा' या हेतूने काम करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात घडते वेगळेच. मला मत देणारा आणि न देणारा, असे सरळ दोन गट करून काही लोक कारभार करू पाहतात.

त्यातून लोकांतही दुफळी निर्माण होते. सत्ताधारी-विरोधक असे गाव विभागले जाते. तेथूनच खऱ्या अर्थाने लोकसहभाग वाढण्यात अडचणी येतात. "आमची सत्ता आल्यावर पाहू', ही भावनाच अधोगतीचे कारण ठरते. सत्ताधाऱ्यांना आपण करतोय, तीच पूर्व दिशा वाटू लागते. संवाद राहत नाही. लोकमताचा आदर होत नाही. ग्रामसभांत राडा होतो. पाच वर्षे गोंधळ सुरु राहतो आणि मग गावकरी म्हणतात, कालचा गोंधळ बरा होता. 

शासनाच्या नव्या धोरणाने गावाच्या हातात गावचा कारभार सोपवला आहे. अधिकाधिक निधी थेट मिळतोय. त्याच्या विनियोगात गावचा सहभाग हवाच, शिवाय काही योजना या लोकसहभागाशिवाय शक्‍यच नाही. रस्ते, गटारी, पिण्याचे पाणी आणि वीजपुरवठा म्हणजे विकास नव्हेत. ते तर प्राधान्याने गावाला दिलेच पाहिजे. त्यापलीकडे जावून गावाला नवा चेहरा देणाऱ्या योजना प्रभावी राबवणे गरजेचे असते. ते करणाऱ्या गावांचा गौरवही केला जातो आणि त्या तुलनेत घसघशीत अतिरिक्त निधीही बक्षिस रुपात मिळतो. जिल्ह्यातील तुंग, कवठेपिरान, यमाजी पाटलावाडी गावांनी विविध योजनांत राज्यात छाप सोडली. त्यांचे आजही कौतुक केले जाते. हे लोकसहभागाचेच यश आहे. 

लोकसहभागातून उपक्रम 

  • शंभर टक्के लसीकरण 
  • स्वच्छ व कचरामुक्त गाव 
  • शाळा व अंगणवाडीत 100 टक्के पटनोंदणी 
  • गावातील सर्व क्षेत्र पिकाखाली आणणे 
  • शोषखड्ड्यांचा व परसबागांचा वापर करून सांडपाणी व्यवस्थापन 
  • स्वच्छतागृह व शौचालय वापर शंभर टक्के 
  • कुपोषण मुक्त गाव, बालमजूर मुक्त गाव 
  • तंटामुक्त, व्यसनमुक्त, प्लास्टिकमुक्त गाव 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! वर्षा गायकवाडांकडून पराभव स्वीकारावा लागलेल्या अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी; 'या' तीन नामवंतांनाही मिळाली संधी

Maharashtra Bar Strike : मद्यपींसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरातील बार उद्या राहणार बंद; HRAWI चा जाहीर पाठिंबा, काय आहे कारण?

Kolhapur : ए. एस. ट्रेडर्सच्या माध्यमातून कोल्हापूर व बेळगावातील गोरगरिबांना लुटायचा, पोलिसांनी ट्रॅप लावून मुख्य एजंटला केली अटक

Flight Cancellation:'तांत्रिक कारणामुळे गोव्यातून विमानाचे उड्डाण रद्द'; ५९ प्रवासी सोलापूर विमानतळावरून परतले; नाईट लॅंडिंग नसल्याने गैरसोय

Latest Marathi News Updates : मराठीबहुल मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना भेटणार; महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचा निर्णय

SCROLL FOR NEXT