farmer 
पश्चिम महाराष्ट्र

माहिती आहे का...केंद्रीय कृषी अभ्यास समितीचा नुसताच महाराष्ट्र दौरा 

तात्या लांडगे

सोलापूर : राज्यात शेतकऱ्यांच्या अडचणी, अपेक्षा जाणून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करण्याच्या उद्देशाने केंद्र स्तरावरील कृषी विषयक अभ्यास समिती 2015 नंतर आता 23 व 24 जानेवारीला महाराष्ट्र (नागपूर) दौऱ्यावर येत आहे. मात्र, ही समिती शेतकऱ्यांशी संवाद न साधता अन्‌ प्रत्यक्ष बांधावर न जाता कार्यालयात बसूनच अधिकाऱ्यांशी चर्चा करुन परतणार आहे. 30 सदस्यीय समितीत महाराष्ट्रातील चार खासदारांचा समावेश आहे. 


केंद्रीय कृषी विषयक अभ्यास समितीने राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधावा, असे पत्र कृषी विभागाने समितीला दिले आहे. त्यानुसार पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, नागपूर, अमरावती, नाशिक या जिल्ह्यांमधील सुमारे 30 शेतकऱ्यांची नावे समितीला कळविण्यात आली आहेत. मात्र, समितीने त्यावर अद्याप काहीच उत्तर दिले नसल्याचे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या समितीत महाराष्ट्रातील खासदार अमोल कोल्हे, नारायण राणे, नवनीत राणा, विनायक राऊत यांचा समावेश असल्याची माहिती उपसंचालक डी. बी. पाटील यांनी सांगितले. ही समिती नागपूर कार्यालयात बसून पिकविम्याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असून अन्य विषयांवर काहीच चर्चा होणार नसल्याचे कृषी संचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

पाच वर्षातून एकदा समितीचा होतो दौरा 
केंद्र सरकारची कृषी विषयक अभ्यास समिती 23 व 24 जानेवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून दर पाच वर्षातून एकदा या समितीकडून अभ्यास दौरा होतो. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून त्यावर ठोस उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ही समिती महत्त्वाची असून पिकविम्याबाबत समिती चर्चा करणार आहे. नागपूर येथे बैठक होणार असून त्यानंतर समितीचे सदस्य संत्रा, कापूस संशोधन केंद्र व मृद सर्व्हेक्षण केंद्राची पाहणी करणार आहे. 
- डी. बी. पाटील, सहसंचालक, कृषी 

समितीची ठळक वैशिष्ट्ये... 

  • कृषी विषयक 30 सदस्यीय केंद्रीय अभ्यास समितीत महाराष्ट्रातील चार खासदार 
  • शेतकऱ्यांशी संवादावर प्रश्‍नचिन्ह, बांधावर जावून पाहणी नाही तर कार्यालयातच अधिकाऱ्यांशी चर्चा 
  • राजस्थानातून समिती येणार नागपूरला : त्याठिकाणाहून दोन दिवसात समिती अन्य राज्यात रवाना 
  • पिकविम्यावरच समिती करणार अधिकाऱ्यांशी चर्चा : शेतकरी आत्महत्या, हमीभावासह अन्य विषयांना बगल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjain Shahi Masjid: मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळली! उज्जैनची शाही मशीद पाडण्यास स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयाचा नकार

‘राइज अँड फॉल 2’मध्ये मोठा राडा! शहजाद पूनावालांशी सिवेत तोमरचं जोरदार भांडण; धक्का दिला, कपडेही फाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

Ferritin Test: ‘नॉर्मल’ हिमोग्लोबिनमुळे गाफील राहू नका! ‘फेरिटिन’ टेस्टही आहे तितकीच महत्त्वाची

Latest Marathi News Live Update: सोलापूर शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारिणी जाहीर

WPL 2027 Retaintion Full List: गुजरातने तब्बल १५ खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर RCB-MI संघात कर्णधारांसह प्रमुख खेळाडू रिटेन

SCROLL FOR NEXT