Challenge of controlling Dengue along with Corona before Sangli Municipal Corporation 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली महापालिकेसमोर कोरोनासह या साथीचेही आव्हान

सकाळवृत्तसेवा

सांगली : महापालिकेने कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यश मिळवले. महापालिका क्षेत्रात महिन्याभरात एकच रुग्ण आढळून आला. आता कोरोनासोबत डेंगीचे आव्हान आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका क्षेत्रात उद्या (ता. 23) पासून आरोग्य विभागाच्यावतीने धूर, औषध फवारणीचे काम सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.

काही दिवसांत महापालिका क्षेत्रात डेंगीचे रुग्ण आढळून येऊ लागलेत. प्रादुर्भाव लक्षात घेता चार प्रभागांसाठी प्रत्येकी 15 याप्रमाणे 60 कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाद्वारे उद्या (ता. 23) पासून उपाययोजनांना सुरवात करण्यात येणार आहे. धूर फवारणी आणि औषध फवारणी यावर भर दिला जाणार आहे. 

हे पथक सकाळी घराघरांत आणि संध्याकाळी घराघरात धूर फवारणीचे काम करेल. झोपडपट्टी भाग व दाट लोकवस्तीचा भाग हे प्राधान्यक्रम राहतील. तारीखनिहाय व भाग निहाय वेळापत्रक कर्मचाऱ्यांच्या मोबाईल नंबरसह घोषित केले जाणार आहेत. 

डेंगीची सुरवात घरापासूनच होते. आपले घर, घराचा परिसर स्वच्छ ठेवा. घरातील पाणी साठवण्याच्या जागा तपासून स्वच्छ करा. कोरडा दिवस पाळा, असे आवाहन आयुक्‍त नितीन कापडणीस यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking : बांगलादेशचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कार, सरकारची घोषणा! भारतात न खेळण्याच्या भूमिकेवर ठाम...

BMC Mayor: बीएमसीत सत्तेचा नवा अध्याय सुरू होणार! भाजपच्या 'या' पाच महिला नगरसेवक शर्यतीत; कुणाला संधी मिळणार?

Ranji Trophy : सर्फराज खानचे आणखी एक खणखणीत शतक; अजित आगरकर तरीही देणार नाही संधी, कारण...

Girish Mahajan : "चुका नडल्या, नाहीतर आकडा ९० पार असता!" नाशिकच्या निकालावर गिरीश महाजनांची फटकेबाजी

Supreme Court Clerk Job: सुप्रीम कोर्टात लॉ क्लर्क भरती जाहीर; १ लाख पर्यंत पगार, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

SCROLL FOR NEXT