election esakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव - निवडणुक संपली; आता वेध अध्यक्ष निवडीची

सतीश जाधव

औद्योगिकच्या १० सदस्यांपैकी अध्यक्ष कोण होणार हे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.

बेळगाव : चेंबर ऑफ कॉमर्स अँन्ड इंडस्ट्रीजची निवडणूक नुकताच पार पडली. सदस्यांना व उद्योजकांना वेध लागले आहेत ते अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचे. यंदा औद्योगिक गटाला अध्यक्षपदाचा मान दिला जाणार आहे. यामुळे औद्योगिकच्या १० सदस्यांपैकी अध्यक्ष कोण होणार हे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. चेंबरची बैठक पुढील महिन्यात होणार आहे. या बैठकीत अध्यक्ष निवडीसंबंधी चर्चा होऊन शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्स कार्यरत आहे. चेंबरचे एकूण २ हजार मतदार आहेत. चेंबरवर एकूण २६ सदस्य आहेत. यापैकी १० सदस्य औद्योगिकमधून तर १६ सदस्य व्यापारीमधून निवडूण जातात. यातील २४ सदस्य तीन वर्षासाठी तर २ सदस्यांची एक वर्षासाठी निवड होते. दरवर्षी १० जागांसाठी निवडणूक होते. यामध्ये ४ सदस्य औद्योगिक व ६ सदस्य व्यापाऱ्यांतून निवडून जातात. या २६ सदस्यातील अध्यक्ष निवडला जातो. प्रत्येक वर्षी अध्यक्षाची निवड होते. अध्यक्षपद एक वर्षे औद्योगिककडे तर एक वर्षे व्यापारी गटाकडे जाते. व्यापारीमधून पंचाक्षरी चोन्नद हे अध्यक्ष होते. यंदा औद्योगिकचा अध्यक्ष होणार आहे.

यातून होणार चेंबरचा अध्यक्ष

यावेळी औद्योगिकचे रोहन जुवळी, सी. सी. होन्नडकट्टी, दिलीप चिंडक, कीथ मचाडो, सचीन सबनीस, आनंद देसाई, उदय जोशी, सतीश कुलकर्णी, प्रभाकर नागरमुन्नोळी व संचीत कित्तूर हे चेंबरचे सदस्य आहेत. हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे. अध्यक्षांबरोबर एकूण ६ जणांची टीम निवडली जाते. यामध्ये ज्या गटाचा अध्यक्ष आहे. त्या गटाकडे सचीव व दुसरा उपाध्यक्ष तसेच दुसऱ्या गटाला प्रहिला उपाध्यक्ष, खजिनदार व जाँइंट सेक्रेटरीची निवड केली जाते. ही निवड अध्यक्ष निवडीदिवशीच केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price Today : एलपीजी दरवाढीनंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या महाग झाले की स्वस्त?

Akola: धान्याची पोती उचलणाऱ्यांच्या घरातच उपासमारी; ११० माथाडी कामगारांची मजुरी रखडली; कुटुंबीयांवर आर्थिक संकट

Maharashtra:तळकोकणात आनंदसरी;मॉन्सूनचे सिंधुदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्यांत आगमन

New Marathi releases : खेडूत ते क्रिकेटर, टेक-३, राजूभाई बीएएमएस आणि सिंधी; प्रेरणादायी प्रवासकथांच्या नव्या मराठी पुस्तकांची ओळख

French Open Women's Champion: 19 वर्षीय मीराचा इतिहास! फ्रेंच ओपन जिंकत केला असा पराक्रम, जो अनेक दिग्गजांनाही जमला नाही

SCROLL FOR NEXT