checking in kognoli to enter a vehicle in karnataka checking in border belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : महाराष्ट्रातून येणाऱ्यांची कोगनोळी नाक्यावर होणार तपासणी

अनिल पाटील

कोगनोळी (बेळगाव) : गेल्या चार दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कर्नाटकाचे प्रवेशद्वार असणाऱ्या कोगनोळी टोलनाक्यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व वाहने व प्रवाशांची तपासणी करूनच कर्नाटकात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी शनिवारी आज दिली.

येथील राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या कोगनोळी टोलनाक्यावर तहसीलदार कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत विभागाच्या वतीने कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांसह प्रवाशांची तपासणी सुरू आहे. या कामी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आशा सेविका, आरोग्य अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

यावेळी निपाणीचे सर्कल अधिकारी अजित वंजोळे, बेडकिहाळचे सर्कल अधिकारी संजय नेमन्नावर, तलाठी शिरीष पोवार, तलाठी के. एल. पुजारी, कोगनोळीचे ग्रामविकास अधिकारी डी. बी. जाधव, निपाणी तालुका ग्रामसहाय्यक एम. ए. मुल्ला, उमेश कोळी, एल. बी. पुजारी, बेनाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी सलीम मुजावर, आशा कार्यकर्त्या, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आर. बी. पिंपळे, एम. डी. युसुफखान, आरोग्य सेविका ए. एस. मधाळे आदींसह कर्मचाऱयांना कोगनोळी टोल नाक्यावर तैनात करण्यात आले आहे.

लक्षणे असल्यास परत पाठविणार

कोगनोळी टोलनाक्यावर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी सर्व चारचाकी वाहने, इतर वाहने आणि त्यातील प्रवाशांची तपासणी करून कर्नाटकात प्रवेश दिला जाणार आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांमध्ये ताप, खोकला, सर्दी अशी लक्षणे असल्यास त्यांना परत पाठवण्यात येणार असल्याचेही यावेळी तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.
  

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT