MLA Anil Benake 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आमदार बेनकेंना भोवणार?

कोरोना नियमावलीचे उल्लंगन केल्याचा ठपका

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : कोरोना नियमांचे उल्लंघन करत छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक साजरा केल्याचा ठपका ठेवत आमदार अनिल बेनके(MLA Anil Benake) यांच्यासह २५ जणांविरुद्ध कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच चव्हाट गल्ली येथे म्हैस पळविण्याच्या शर्यतीदरम्यान देखील कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याने यापूर्वीच मार्केट पोलीस ठाण्यात २७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. याठिकाणी देखील ते उपस्थित होते. मात्र, या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केले आहेत. जाहीर सभा, समारंभ, आंदोलने, मोर्चे काढण्यावर निर्बंध आहेत. मोठ्या संख्येने एकत्र जमत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे सर्वांनी मास्क परिधान करावे, मास्क परिधान न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पण लोकप्रतिनिधीकडूनच सरकारच्या कोरोना नियमावलीला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. राजकीय कार्यक्रमादरम्यान मोठ्या संख्येने लोक एकत्र जमत आहेत.

१६ जानेवारी रोजी संभाजी चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या ठिकाणी आमदार अनिल बेनके यांच्यासह कार्यकर्त्यांनी कोरोना नियमांचे पालन केले नव्हते. त्यामुळे या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात आमदार अनिल बेनके यांच्यासह २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी यांनी सकाळला दिली. यानंतर चव्हाट गल्ली येथे देखील आमदार अनिल बेनके यांच्या उपस्थितीत म्हैस पळविण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणीदेखील नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवून मार्केट पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आमदार बेनके यांच्यावर गुन्हा दाखल झाला नसला तरी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या व आयोजक अशा एकूण २७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT