Chicken, egg prices soar !; Expert advice for boosting immunity to corona in Sangali 
पश्चिम महाराष्ट्र

चिकन, अंड्यांचे भाव तेजीत!; कोरोनामुळे रोगप्रतिकारशक्‍ती वाढीसाठी तज्ज्ञांचा सल्ला

हिंम्मतराव नायकवडी

बिळाशी (जि. सांगली) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शारीरिक तंदुरुस्तीबरोबर प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पौष्टिक आहाराबरोबर मटण, अंडी, चिकन खाण्याचे सल्ले वारंवार डॉक्‍टर, आहार तज्ज्ञांकडून दिले जात आहेत. सोशल मीडियावरही याबाबत प्रबोधन होऊ लागले आहे. मटणाचा दर 600 रुपयांपर्यत स्थिरावला असला, तरी 160 ते 180 रुपयांना मिळणारे चिकन आता चक्क 250 ते 260 किलो इतके झाले आहे. 


मागील फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने शारीरिक आरोग्याची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेकदा डॉक्‍टरांकडून मोड आलेली कडधान्ये, भाजीपाला यांच्यासह नागरिकांना चिकन व मटण खाण्याचा सल्ले दिले जात आहेत.

रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी अंडे उपयुक्त असल्याने सध्या त्याच्या मागणीत वाढ झाली आहे. दरम्यान, मोठ्या व्यापाऱ्यांनी साठेबाजी सुरू केल्याने, कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने ग्राहकांना दुप्पट दराने अंडी खरेदी करावी लागत आहेत. उन्हाळ्यात अंड्यांची मागणी कमी होऊन भावात घसरण होत असते, मात्र यंदा कोरोनामुळे भावात मोठी वाढ झाली आहे. 


उन्हाळ्यात इंग्लिश अंड्याचा प्रतिनग दर सुमारे चार ते साडेचार रुपये असतो; मात्र सध्या तो सहा रुपयांपर्यंत पोचला आहे. तसेच गावरान अंड्याचा प्रतिनग दर सुमारे पाच ते सहा रुपये असतो; तो आता 8 ते 10 रुपयांपर्यंत झाला आहे.

पोल्ट्री व्यावसायिकांनी काहीअंशी दर वाढवले, मात्र चिकन व्यावसायिकांनी दरवाढीच्या नावाखाली अडीचशे ते दोनशेसाठ रुपये दर केले आहेत. मागीलवेळी पोल्ट्री व्यावसायिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते, मात्र यावेळी कडक उन्हाळ्यात अंडी, चिकनच्या मागणीत वाढ झाल्याने भाव तेजीत आले आहेत. 

संपादन : युवराज यादव 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT