Dog
Dog 
पश्चिम महाराष्ट्र

भटक्‍या कुत्र्यांच्या हल्ल्यात नगरमध्ये बालकाचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

नगर - भटक्‍या कुत्र्यांच्या हल्ल्यात आज येथील तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. आयुष दिलखुश प्रजापती असे त्याचे नाव असून, कोठला परिसरातील एसटी कॉलनीजवळ ही दुर्घटना घडली.

प्रजापती कुटुंब घास गल्लीत राहते. आयुषची आई मोना आणि आजी धुणी-भांड्याची कामे करतात. त्या नेहमीप्रमाणे सकाळी कामावर गेल्या होत्या. आयुष घराजवळच खेळत होता. सकाळी आठच्या सुमारास भटक्‍या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याच्यासोबत खेळत असलेल्या मुलांनी आरडाओरडा केल्यानंतर जवळच असलेले नरेश चव्हाण, अरुण झेंडे यांच्यासह नागरिकांनी आयुषची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली. तत्काळ त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. कुत्र्यांनी त्याच्या संपूर्ण अंगाचे लचके तोडले होते. त्याच्या डोक्‍याला पायाला आणि हाताला गंभीर जखमा झाल्या होत्या. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून त्याला लगेच पुण्याला हलविले. मात्र, वाटेतच आयुषचा मृत्यू झाला. तरीही उत्तरीय तपासणीसाठी त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात नेण्यात आला.

आयुषच्या वडिलांचे पूर्वीच निधन झाले. आजोबाही हयात नाहीत. त्यामुळे एकुलता असलेला आयुष, त्याची आई आणि आजी असे तिघेजण घास गल्ली भागात राहत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT