पश्चिम महाराष्ट्र

यमगर्णीतील पूरग्रस्त संतप्त : आता 'आश्वासन नको,घर द्या'

सकाळ वृत्तसेवा

निपाणीः 2019 मध्ये महापूर पाहण्यासाठी आल्यावर घरे देण्यासह पूरग्रस्तांचे कायमस्वरुपी स्थलांतर करण्याचे आश्वासन आपण दिले होते. पण अद्याप स्थलांतरासह घरे मिळालेली नाहीत. आम्हाला आश्वासन नको, सुरक्षितस्थळी हक्काची घरे द्या, अशी संतप्त मागणी यमगर्णीतील पूरग्रस्तांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा (CM B. S. Yeddyurappa) यांच्याकडे केली. रविवारी (ता. 25) मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी वेदगंगा नदी (Vedhganga River) परिसरातील पुराची पाहणी केल्यावर त्यांनी मराठी शाळेतील निवारा केंद्रात असलेल्या पूरग्रस्तांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना धीर देण्याचा प्रयत्न केला, मात्र 2019 मधील आश्वासनांची आठवण करून देत पूरग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला संताप व्यक्त केला. यावेळी निवारा केंद्रातील महिलांसह पूरग्रस्तांनी 2019 मध्ये यमगर्णीचे (yamgarni) स्थलांतर करण्याचे आश्वासन तुम्ही दिले होते, अशी आठवण मुख्यमंत्र्यांना करून दिली. (cm-yeddyurappa- karnataka-flood-visit--nipani-kodni-belguam-flood-news-akb84)

दरम्यान, उपस्थित सर्वांनी अनेक प्रश्नांचा भडीमार मुख्यमंत्र्यांवर सुरु केल्यावर उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी मध्यस्थी करत पूरग्रस्तांना शांत केले. त्यांनी पूरग्रस्तांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांना त्यांची आठवण सांगितली. यावेळी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी काळजी करू नका, पूरग्रस्तांना कायमची घरे देण्याची जबाबदारी आमची, असे सांगत निवारा केंद्रातून काढता पाय घेतला. यावेळी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, महसूलमंत्री आर. अशोक, विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी, नगराध्यक्ष जयवंत भाटले, ग्रामपंचायत अध्यक्षा राजश्री पोवार यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, निपाणीचे नगरसेवक, अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यमगर्णीतील पूरग्रस्तांतून नाराजी

यमगर्णी मराठी शाळेत अनेक वर्गखोल्यांमध्ये पूरग्रस्तांच्या निवारयाची सोय केली आहे. मुख्यमंत्री पूरग्रस्तांच्या भेटीला येणार म्हणून अनेक पूरग्रस्तांनी मुख्यमंत्र्यासमोर समस्या मांडण्याचे ठरविले होते. मात्र मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी मोजक्याच वर्ग खोल्यात जावून पूरग्रस्तांचा निरोप घेतला. इतर वर्ग खोल्यातील पूरग्रस्तांना मुख्यमंत्र्यांसमोर समस्या मांडण्याची इच्छा असताना त्यांची भेट होऊ न शकल्याने त्यांच्यातून नाराजी व्यक्त झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नालासोपारा ZP शाळेत कुकरचा स्फोट; भडका उडताच गरम खिचडी चिमुकल्यांच्या अंगावर; 2 विद्यार्थ्यांसह महिला जखमी

नारकरांच्या घरी झाली सत्यनारायण पूजा; ऐश्वर्या यांनी स्वतः बनवला प्रसादाचा शिरा, कशी केली तयारी? दाखवला खास व्हिडिओ

Hartalika 2026: हरतालिकेच्या दिवशी ‘या’ 3 राशींवर होणार महादेव पार्वतीची विशेष कृपा; धनलाभाचे संकेत

Marathi News Live Updates : महाकाळा परिसरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

Kharge Rally Controversy : मल्लिकार्जुन खर्गेंच्या रॅलीनंतर 'शुद्धीकरण' वाद पेटला! राज्यभरातून 80 तक्रारींनंतर पोलिसांचं मोठं पाऊल, काय आहे नेमकं प्रकरण?

SCROLL FOR NEXT