coffee with prashant damle in sangli discussion various points about theatre
coffee with prashant damle in sangli discussion various points about theatre 
पश्चिम महाराष्ट्र

नाटक बघण्याचे 'कल्चर' वाढावे ; कॉफी विथ सकाळमध्ये प्रशांत दामले यांच्याशी दिलखुलास गप्पा

सकाळ वृत्तसेवा

सांगली : मराठी नाटक 'लाईव्ह' बघणाची रसिकांची इच्छा आजही कायम आहे. त्यांची नाटकाला हजेरी कमी-जास्त होते, मात्र नाटकांवरील प्रेम कायम आहे. रसिकांसाठी बरीच माध्यमं उपलब्ध आहेत. त्यातूनही नव्या पिढीचा नाटकाकडे ओढा वाढावा, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे. नाटक बघणे हे 'कल्चर' लहानपणापासून असावे लागते. ती जबाबदारी पालकांनी घेतली पाहिजे. तरूण पिढीत नाटक रूजवण्यासाठी पालक, कलाकार आणि शाळांचा पुढाकारही तितकाच महत्वाचा आहे, असे मत मत ज्येष्ठ नाट्यकलावंत व अभिनेते प्रशांत दामले यांनी येथे व्यक्त केले. 

'सकाळ' सांगली कार्यालयात आयोजित 'कॉफी वुईथ सकाळ'मध्ये अभिनेते दामले यांनी दिलखुलास संवाद साधला. सहयोगी संपादक शेखर जोशी आणि 'सकाळ' टीम बरोबर झालेल्या संवादातून दामले यांनी कोरोनानंतर नाट्यक्षेत्राला उर्जितावस्था देण्यासाठी काही गोष्टींचा उलगडा केला. 

प्रश्‍न : कोरोनानंतर नाट्यक्षेत्राची अवस्था काय? 

श्री. दामले : गेल्या आठ नऊ महिन्यांत नाट्यगृह बंदच होते. अनेक कलाकारांवर संकट आले. त्यांना मदत करण्याची भूमिका आम्ही घेतली. नाटकाला परवानगी दिल्यानंतर 50 टक्के प्रेक्षक संख्येत नाटक करताना आर्थिक गणित जुळवताना तारेवरची कसरत करावी लागली. नाटक सुरू करण्यासाठी मुंबई, ठाणे, पुणेसह अनेक ठिकाणी महापालिका आयुक्तांनी सवलतीच्या दरात नाट्यगृह उपलब्ध करून दिली. टोल माफीसह काही सवलती मिळाल्या. खर्च आटोक्‍यात आणण्यासाठी कलाकारांनी मानधनात कपात केली. रसिकांनी देखील पाठबळ दिले. त्यानंतर सध्या "कट टू कट' प्रयोग होताहेत. 

प्रश्‍न : नाटकाकडे नव्या पिढी आकर्षित कशी होईल ? 

श्री. दामले : चित्रपट आणि नाटकात फार मोठा फरक आहे. चित्रपटाचे एकदा शुटींग झाले की काम संपते. नाटक रोजच्या रोज सादर करावे लागते. नाटकातला जीवंतपणाच प्रेक्षकांना भावतो. सिनेमा व नाटकाची तुलना करता 45 ते 50 टक्के रसिकांचा नाटकाकडे ओढा असतो. नाटकाकडे नव्या पिढीला आकर्षित करण्यासाठी लहानपणापासून त्यांच्यात "कल्चर' असावे लागते. ती जबाबदारी पालकांची असते. तरूण पिढी नाटकाकडे येण्यासाठी पालक, कलाकार आणि शाळांमधूनही प्रयत्न झाले पाहिजेत. 

प्रश्‍न : नाट्यसंहिता आणि अन्य गोष्टी कितपत महत्वाच्या असतात? 

श्री. दामले : नाट्यसंहिता म्हणजे इमारतीचा पाया समजला जातो. त्यामुळे संहिता अतिशय महत्वाची आहे. माझ्या सुदैवाने चांगले लेखक नशिबी आले. आत्तापर्यंत त्यांनी 12 हजार 300 नाटकाचे प्रयोग केले आहेत, हा जागतिक विक्रम आहे. आज जुनी नाटके जेवढी कराल, तेवढे भाषेवर आणि संभाषणावर प्रभुत्व येते. शेवटी नाटक ही एक प्रक्रिया आहे. सामुहिक जबाबदारी आहे. चुका झाकत आणि टाळत गेलो तर नाटक यशस्वी होते. तसेच नाटक हे सर्व्हीस इंडस्ट्रीजच्या पुढचे आहे. आधी पैसे घेऊन आपण सेवा देत असतो. त्यामुळे उत्तरदायित्व सर्वांवरच असते. 

प्रश्‍न : नाट्यक्षेत्राकडे येणाऱ्या तरूणांना काय संदेश द्याल? 

श्री. दामले : रंगभूमीवर काम करण्यासाठी मातृभाषेवर प्रभुत्व आवश्‍यक आहे. संभाषण कौशल्य, बोलताना शब्दप्रयोग कसा करावा, स्वर कसे असावेत, हे महत्वाचे. व्याकरणाचा अभ्यासही आवश्‍यक ठरतो. वाचन आवश्‍यक असून चांगली नाटके बघितली पाहिजेत. इथे कोणताही शॉर्टकट नाही. 

प्रश्‍न : नाटक 'ऑनलाईन' होईल का ? 

श्री. दामले : ऑनलाइन माध्यमांवर अनेक वेबसीरीज येत असून त्यांना "सेन्सॉरशिप'ची गरज आहे काय? या प्रश्‍नांवर श्री. दामले म्हणाले, ""वेबसिरीजना सेन्सॉरशीप नसली तरी "सेल्फ सेन्सॉरशीप' गरजेची आहे. नाटक ऑनलाइन माध्यमांवर येत आहे. नाट्यगृहात येवूनच नाटक पाहणे हे प्रेक्षकांना आवडते. त्यामुळे नाटक "ऑनलाइन'कडे वळेल, असे वाटत नाही. 

प्रश्‍न : नाट्यक्षेत्रातील नवा आश्‍वासन चेहरा कोण वाटतो ? 

श्री. दामले : संकर्षण कराडे या तरुणाकडे ती क्षमता आहे. तो आश्‍वासक वाटतो, त्याचे विनोदाचे टायमिंग, त्याची भाषा, अभिनय उत्तम आहे. 

प्रश्‍न : 'नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मधून आलेले अन्‌ इतर, असा भेदभाव आहे का? 

श्री. दामले : कुणी कितीही सांगितले तरी रसिकांनी कुणाला स्विकारायचे हे त्यांच्यावर आहे. कुणी एनएसडीमधून आलाय म्हणून रसिक स्विकारतीलच असे नाही. त्यासाठी तुमची मेहनत महत्वाची ठरते.  

संंपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: ठाणे लोकसभा शिवसेनेचीच, नरेश मस्के यांना उमेदवारी! श्रीकांत शिंदेंचेही नाव कल्याणमधून जाहीर

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील शाळांमधून विद्यार्थ्यांना काढलं बाहेर; बॉम्बची धमकी आल्यामुळे प्रशासन अलर्ट

Abhijeet bhattacharya: "लग्नात गाणं गायल्यानं औकात कमी होते", म्हणणाऱ्या अभिजीत भट्टाचार्यांना गायकानं व्हिडीओ शेअर करत दिलं सडेतोड उत्तर

T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन; 'या' खेळाडूंना मिळणार अंतिम-11 मध्ये स्थान

Narendra Modi : काँग्रेसपासून सावध राहा ; लातूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत विरोधकांवर हल्ला

SCROLL FOR NEXT