पश्चिम महाराष्ट्र

जिल्हाधिकाऱ्यांकडून अण्णांच्या तब्येतीची विचारपूस 

सकाळ वृत्तसेवा

पारनेर : जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज सकाळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर हजारे यांचे मौन कशासाठी आहे, त्यांच्या मागण्या काय आहेत, याची माहिती घेऊन त्या विषयावर सविस्तर चर्चा केली. 

हजारे यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात, तसेच या गुन्ह्यांशी संबंधित आरोपींना तत्काळ शिक्षा व्हावी या मागण्यांसाठी मौन सुरू केले आहे. मौनाचा आज दहावा दिवस होता. गेले नऊ दिवस सरकारच्या बाजूने कोणतीच दखल घेतली गेली नव्हती; मात्र आज सकाळपासून सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. 

जिल्हाधिकाऱ्यांनी हजारे यांची भेट घेतल्यानंतर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा किंवा सरकारचा काही तरी संदेश घेऊन आले असावेत, अशी चर्चा राळेगणसिद्धीत सुरू झाली. उशिरा का होईना, सरकारी पातळीवर हालचाली सुरू झाल्याने राळेगणसिद्धीत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळपासून हजारे यांना भेटणारांची व पाठिंबा देणारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

बंधाऱ्याची पाहणी 
जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी हजारे यांच्या भेटीनंतर, हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे तलाव व बंधाऱ्यांच्या गळतीवर प्लॅस्टिकचा वापर करून गळती थांबविण्याचा विशेष असा यशस्वी प्रयोग केला आहे. त्या प्रयोगाची प्रत्यक्षात बंधाऱ्यावर जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update: पुढील चार दिवसांत पाऊस कसा असेल? हवामान विभागाने दिला अंदाज

SSC HSC Supplementary Result : दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवारी होणार जाहीर

ST Bus: पंढरपूर वारीसाठी एसटीची धाव! राज्यभर ५५०० विशेष बसचे नियोजन; महिलांना ५०% सवलत, तर 'या' प्रवाशांना मोफत प्रवास

Pune News : डॉ. प्रदीप कुरुलकर प्रकरणाच्या खटल्यास सुरुवात; पहिल्या पंच साक्षीदाराची साक्ष नोंदविली

IND vs ENG: 'T20 मालिकेतील पराभवाचा वनडेवर परिणाम नाही, कारण...', कर्णधार गिल स्पष्टच बोलला; २०२७ वर्ल्ड कपचीही सांगितली योजना

SCROLL FOR NEXT