dr. bhosle photo 
पश्चिम महाराष्ट्र

जिल्हाधिकाऱ्यांमुळे सोलापुरात कर्जमुक्तीला गती 

प्रमोद बोडके

सोलापूर : मुख्यंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त देण्यासाठी जाहीर केलेल्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेने सोलापूर जिल्ह्यात प्रचंड गती घेतली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या नियोजनामुळे सोलापूर जिल्ह्यात या योजनेतून कमी त्रासात, कमी वेळेत शेतकऱ्यांना माहिती मिळू लागली आहे. या योजनेसाठी महसूल, कृषी, सहकार विभाग आणि बॅंकिंगमधील अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण, योजनेचे कालबध्द वेळापत्रक आखल्याने पूर्वीच्या कर्जमाफीच्या तुलनेत आता प्रशासकीय यंत्रणेत गोंधळ कमी दिसत आहे. 
हेही वाचा - अरे बापरे : ज्वारीमध्ये भरेनात दाणे 
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी कर्जमुक्तीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उत्तर सोलापूर तालुक्‍यातील नान्नज येथील एसबीआय बॅंकेची शाखा, नान्नज येतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची शाखा आणि नान्नज विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या माध्यमातून शेतकरी, ग्रामस्थ आणि बॅंक कर्मचाऱ्यांशी योजना सुरू होण्यापूर्वीच संवाद साधला आहे. योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यानंतर मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी लांबोटी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बॅंक, मोहोळ येथील भारतीय स्टेट बॅंक, बॅंक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बॅंक, आयडीबीआय बॅंकेच्या शाखेस भेट दिली. या भेटीत त्यांनी शेतकरी कर्जमुक्ती संदर्भात बॅंकांनी केलेल्या तयारीची माहिती घेतली. कर्जमुक्ती योजना सुरळीतपणे राबविण्यासाठी, कोणत्या तांत्रिक अडचणी येऊ शकतात, त्यावर काय उपाययोजना करायला हवी याबाबत बॅंकेचे व्यवस्थापक आणि कर्मचारी यांच्याशी चर्चा केली. 
हेही वाचा - शनिवारपासून होणार जनावर बाजारस सुरवात 
जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या मोहोळ दौऱ्यात मोहोळचे तहसीलदार जीवन बनसोडे, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, अग्रणी बॅंकेचे अधिकारी अनुराग खंडागळे उपस्थित होते. लांबोटी येथील विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेच्या शाखेत व्यवस्थापक यू. के. बागेवाडीकर यांच्याकडून दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्जदारांची यादी आणि त्यांचे आधारकार्ड क्रमांक खाते क्रमांकाशी संलग्न आहे का याबाबत माहिती घेतली. त्यानंतर डॉ. भोसले यांनी मोहोळ येथील स्टेट बॅंक, बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि आयडीबीआय बॅंकेच्या शाखांना भेट दिली. स्टेट बॅंकेचे व्यवस्थापक सचिन कसबे, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापक अविनाश मेकेन्ना, बॅंक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक लक्ष्मीकांत कांबळे आणि आयडीबीआयचे व्यवस्थापक मनोज दरोडे यांनी माहिती दिली. 
सोलापूर जिल्हा होणार मालामाल 
तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतीच्या तिन्ही टप्प्यात सोलापूर जिल्ह्याला 741 कोटी रुपये मिळाले होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यातच सोलापूर जिल्ह्याला 1144 कोटी रुपये मिळण्याची शक्‍यता आहे. कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील रक्कम व पहिल्या टप्प्यातील रक्कम अंदाजे काढल्यास सोलापूर जिल्ह्याला दिड ते दोन हजार कोटी रुपये मिळण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT