the college start from today in belgaum but corona test compulsory for students and also teachers 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावात महाविद्यालये सुरू मात्र कोरोना चाचणी सक्तीची

मिलिंद देसाई

बेळगाव : गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मंगळवारपासून पदवी व डिप्लोमा महाविद्यालये सुरू झाली आहेत. मात्र विद्यार्थी व प्राध्यापकांना कोरोना चाचणी करून घ्यावी लागणार असल्याने पहिल्या दिवशी महाविद्यालयांच्या आवारात शुकशुकाट दिसून येत आहे. 

कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यापासून महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे महाविद्यालये कधी पासून सुरू होणार याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागून राहिली  होती. देशातील काही राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात पदवी डिप्लोमा महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळत महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. 
विद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांच्या सहमतीचे पत्र सादर करावे लागणार आहे.

जे विद्यार्थी पालकांचे सहमती पत्र देत नाहीत त्याना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच प्राध्यापक व विद्यार्थ्यांना कोरोना चाचणी अहवाल विद्यालयात सादर करावा लागणार असून निगेटिव्ह रिपोर्ट येणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यालयात येणाऱ्या विध्यार्थ्यांनाही आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. सामाजिक अंतर राखून विद्यार्थ्यांना बसावे लागणार आहे. तसेच मास्क वापरावा व गर्दी करू नये अशी सूचनाही शिक्षण खात्यातर्फे करण्यात आली आहे. 

महाविद्यालये सुरू झाल्यावर कशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते यावर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असून डिसेंबर महिन्यात 9 ते 12 पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शिक्षण खाते घेणार आहे. विद्यालये सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी शहर आणि परिसरातील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होती मात्र लवकरच विद्यालयांत गर्दी होईल असे मत व्यक्त केले जात आहे.

"महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय चांगला आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देने आवश्यक आहे."

- गौरव किल्लेकर, विद्यार्थी 

"प्राध्यापक व कर्मचारी यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे तर विद्यार्थ्यांना गणेबैल येथील सरकारी आरोग्य केंद्रात चाचणी करून घेण्याची सूचना करण्यात आली आहे."

- गजानन बेन्नाळकर, प्राचार्य मराठा मंडळ पदवी महाविद्यालय खानापूर

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

FIFA World Cup: आधी संघाचा पराभव अन् पत्रकार परिषदेत कोचला मिळाली वडिलांच्या निधनाची बातमी; Video

Escort Allowance Scheme: शाळेत येण्या-जाण्यासाठी मिळणार सरकारी भत्ता; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी UP सरकारची संवेदनशील योजना

Latest Marathi News Live Update : तिकिटाच्या वादातून एसटी वाहकाला बेदम मारहाण; हिंगोली डेपो बंद ठेवत कर्मचाऱ्यांचे आंदोलन

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT