पश्चिम महाराष्ट्र

'कमांड अँड कंट्रोल'ला 2019 मध्ये मुहूर्त 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : शहरातील नागरिकांचे प्रश्‍न त्वरित सोडविण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत "कमांड अँड कंट्रोल' यंत्रणा उभारण्यात येणार आहे. 2019 मध्ये या कामाला मुहूर्त मिळण्याची शक्‍यता आहे. सध्या ही यंत्रणा उभारण्यासंदर्भात सल्लागारांशी सल्लामसलत सुरू आहे. 

कौन्सिल हॉलच्या मागे असलेल्या खुल्या जागेत ही यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी चार मजली इमारत उभारण्यात येणार असून, त्यामध्ये अत्याधुनिक सुविधा असणार आहेत. ही यंत्रणा आठवड्यातील सातही दिवस चोवीस तास सुरू राहणार आहे. कचरा, नळ फुटणे, आरोग्याची समस्या किंवा महापालिका क्षेत्रातील कोणत्याही समस्येची तक्रार या ठिकाणी नोंदविली जाणार आहे. त्याचा लगेच पाठपुरावाही केला जाणार आहे. एखाद्या तक्रारीचे निराकरण झाले नाही तर त्याची माहिती संबंधित विभागाचे खातेप्रमुख आणि आयुक्तांना दिली जाणार आहे, काम झाले तर त्याचीही माहिती दिली जाणार आहे. 

या सेंटरच्या अंतर्गत सर्व्हेलन्स नेटवर्क, स्काडा प्रणाली, एलईडी स्ट्रीट लाईट, घनकचरा व्यवस्थापन, ऑनलाइन तक्रार निवारण केंद्र, व्हेरीअेबल मेसेज सिस्टिम, ई-टॉयलेट, ड्रेनेज डिस्चार्ज इंटिग्रेशन, हवा गुणवत्ता व ध्वनिप्रदूषण सेन्सर, बायोमेट्रिक प्रणाली, तलावातील पाणी चांगले राहण्यासाठीचे सेन्सर आदी सेवांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. शहरात कोणत्याही ठिकाणी काही घडले की त्याची माहिती त्वरित या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. त्यानुसार तातडीने उपाययोजना केल्या जाणार आहेत. 


सौरऊर्जा प्रकल्प प्रगतिपथावर 

शहराच्या विविध ठिकाणी सौरप्रकल्प राबविण्यात येत आहेत. आयुक्त कार्यालय, महापालिका प्रशासकीय इमारत, कौन्सिल हॉल, सोलापूर विद्यापीठ, नेहरू सायन्स सेंटर या ठिकाणी प्रकल्प सुरू असून, त्या ठिकाणची कामे अंतिम टप्प्यात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT