The complaint was settled without calling the plaintiff 
पश्चिम महाराष्ट्र

झरेत द्राक्षबागातदार अडचणीत; फिर्यादीला न बोलवताच तक्रार निकाली 

सदाशिव पुकळे

झरे : झरे परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सरासरी 80 लाख रुपयांचा गंडा घातला होता. याबाबत पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी अनेक वेळा पोलिसांकडे चौकशी केली असता चौकशी सुरू आहे. आम्ही तुम्हाला बोलावून घेतो असे सांगण्यात येत होते. 

द्राक्ष बागायतदारांनी 15 जुलै 2020 रोजी तक्रार दिली होती. 9 ऑक्‍टोबर रोजी पोलिसांनी फिर्याददार पांडुरंग पुकळे यांना कळविण्यात आले की तुम्हाला चौकशीसाठी बोलावले असता तुम्ही आला नसल्याने तुमचा अर्ज निकाली काढण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यातून संताप व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी, 2017 _18 मध्ये पांडुरंग पुकळे, अधिकराव माने, रावसाहेब गोरड, सुरेश थोरात, अंकुश माने, विष्णू ढोकळे या शेतकऱ्यांनी जुनेद व इस्माईल शेख, शब्बीर शेख यांना द्राक्षे विकली होती. 

काही प्रमाणात रोख रक्कम देण्यात आली होती. व उर्वरित रकमेचा चेक देण्यात आला होता. मात्र चेक बॅंकेत जमा केला असता तो वटला नाही. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांनी त्या व्यापाऱ्याकडे धाव घेतली. त्यांनी चेक जमा करून घेतले व शंभर रुपयांच्या स्टॅंपवर लिहून दिले. व पैसे देण्यासाठी काही दिवसांची मुदत मागून घेतली होती. परंतु काही दिवसानंतर व्यापाऱ्याने फोन उचलणे बंद केले व फोन लागत ही नव्हता त्यामुळे नाईलाजास्तव द्राक्ष बागायतदारांनी आपली फसवणूक झाल्याची फिर्याद आटपाडी पोलिस स्टेशनला नोंद केली. 

फिर्याद नोंद केल्यानंतर सतत पोलिस स्टेशनला संपर्क साधला; परंतु पोलिसांकडून सांगण्यात आले की आम्ही तुम्हाला बोलावून घेतो. परंतु कोणत्याही शेतकऱ्यांना चौकशीसाठी बोलावून घेतले नाही. तर त्यांचा तक्रारी अर्ज निकाली काढून त्यांना दिनांक 15 जुलै 2020 रोजी कळवण्यात आले की तुमचा तक्रारी अर्ज निकाली काढण्यात आला आहे. कारण तुम्हाला बोलवले तुम्ही चौकशीसाठी आला नाही. असे उत्तर देण्यात आले. शेतकऱ्यांना दिलेल्या पत्रानुसार त्या पत्रकावर सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील व पोलिस निरीक्षक बजरंग पाटील यांच्या सह्या आहेत. 

आटपाडी पोलिसांत तक्रार दाखल केली. आम्ही चौकशीसाठी कधी येऊ असं विचारत होतो. मात्र आम्ही बोलावून घेतो असे पोलिसांकडून सांगण्यात येत होते. मात्र आम्हाला विश्वासात न घेता तक्रार निकालात काढण्यात आली आहे, असे आम्हाला पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. 
- पांडुरंग पुकळे, द्राक्ष बागातदार 

फसवणूक आणि तक्रार केलेल्या झरेतील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे. त्या अनुषंगाने कागदपत्रे घेऊन चौकशीसाठी शेतकऱ्यांना बोलावले होते. मात्र कोरोना काळात पोलिसाकडे कामाचा ताण असल्यामुळे जबाब घेता आले नाही. तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी जरी त्यांचे प्रकरण निकालात काढले असले तरी त्यांची तक्रार असेल तर चौकशी करता येऊ शकते. कागदपत्रे तपासून फसवणूक करणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल केले जातील.- 
- बजरंग कांबळे, पोलिस निरीक्षक आटपाडी पोलिस ठाणे

संपादन : प्रफुल्ल सुतार 
सांगली 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray visits Meenatai Thackeray statue : उद्धव ठाकरेंनी केली मीनाताईंच्या पुतळ्याची बारकाईने पाहणी अन् म्हणाले ‘’या मागे दोनच व्यक्ती…’’

World Athletics Championships : नीरज चोप्राने एकाच प्रयत्नात केले सर्वांना गार, आता पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या कामगिरीकडे लक्ष

Uddhav Nimse : मुंबई हायकोर्टाकडूनही जामीन नाकारला: उद्धव निमसे अखेर पोलिसांपुढे शरण

Navratra and Overthinking Tips: मन गोंधळले असेल तर नवरात्रीचे ९ दिवस देतील नवा आधार! अशी करू शकता ओव्हरथिंकिंगवर मात

Jalaj Sharma : जिल्हाधिकारी जलज शर्मांची मोठी घोषणा: नाशिकमधील गड-किल्ले होणार स्वच्छ

SCROLL FOR NEXT