zp banglow 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत अध्यक्षांचा "वसंत' बंगला पाडून कॉम्प्लेक्‍स 

अजित झळके

सांगली ः सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा विश्रामबाग परिसरातील "वसंत' हा बंगला पाडून त्या ठिकाणी व्यावसायिक कॉम्प्लेक्‍स बांधण्याचा प्रस्ताव चर्चेत आला आहे. भाजपच्या एका गटाने त्यावर खासगीत चर्चा केली आहे.

लवकरच तो सर्वसाधारण सभेत चर्चेला घेऊन राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे. त्यासोबत येथील जिल्हा परिषदेसमोरील जलस्वराज्यच्या इमारतीची जागा, महात्मा गांधी वसतीगृह विकसीत करण्याबाबतचा प्रस्तावही आहे. जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढवून या संस्थेला अधिक "आत्मनिर्भर' करण्यासाठी हा मुद्दा चर्चेत आणण्यात आला आहे. 


वसंत बंगल्यात सन 1985 मध्ये रहायला आलेले पहिले अध्यक्ष शिवाजीराव नाईक. हा बैठ्या पद्धतीचा बंगला आहे. त्यावेळी त्या ठिकाणी फारशी वस्ती नव्हती. बंगल्याच्या समोरील रस्त्याकडेची जागा, बंगल्याचे बांधकाम असलेली जागा आणि बंगल्याच्या पाठीमागील जागा अशी सुमारे 10 गुठ्यांची ही मोठी जागा आहे. दक्षिणेला सांगली-मिरज रस्ता आणि पूर्वेला सह्याद्रीनगरचा रस्ता अशी ही कोपऱ्यावरील अतिशय मोक्‍याची जागा मानली जाते. पश्‍चिमेला गाडगीळ सराफ पेढी आणि उत्तरेला आयकॉन इनसारखे मोठे हॉटेल यामुळे या भागाला आधीच व्यावसायिक महत्व प्राप्त झाले आहे. दुसरीकडे या बंगल्याची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. अंतर्गत सजावट उत्तम असली तरी बराच भाग पावसाळ्यात गळतो. त्याच्या डागडुजीचे काम सध्या सुरु आहे. 


जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी जिल्हा परिषदेच्या मालकीची जलस्वराज्य विभागाची जागा विकसीत करण्याचा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी चर्चेत आणला होता. ही जागा जिल्हा परिषदेच्या बरोबर समोर आहे. तेथे सभागृह, काही अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने, मोठ्या परिषदांसाठी स्वतंत्र हॉल अशी मांडणी करता येईल, असा त्यांचा प्रस्ताव आहे. त्याआधी शिवाजीराव नाईक यांनी महात्मा गांधी वसतीगृहाच्या दक्षिणेची रस्त्याकडील बाजूला पूर्ण व्यापारी कॉम्प्लेक्‍स आणि उत्तरेकडे विद्यार्थी वसतीगृह बांधण्याचा प्रस्ताव आणला होता. आता त्यात प्रस्तावांच्या यादीत अध्यक्ष बंगला पाडून व्यापारी कॉम्प्लेक्‍स आणि तेथेच अध्यक्ष निवासस्थान बांधण्याचा मुद्दा वाढला आहे. 


राज्य शासनाने याआधी जिल्हा परिषदांचे हे काम नव्हे, तुम्ही विकास कामे राबवणारी यंत्रणा आहात, अशी भूमिका घेतली होती. आता एकूणच जगावर मोठे संकट आहे. अशा काळात संस्थांनी "आत्मनिर्भर' झाले पाहिजे, असा मुद्दा चर्चेला आला आहे. या संधीचा लाभ जिल्हा परिषदेला होईल का, याकडे लक्ष असणार आहे. अर्थात, या जागा विकसीत करताना राज्य शासनाला, जिल्हा परिषदेला स्वतःची कोणतीही गुंतवणूक करावी लागणार नाही, या मुद्यावर जोर देत हे प्रस्ताव पुढे रेटले जातील, असे सांगण्यात आले. 

------------------

नकटीच्या लग्नाला सतरा विघ्नं 

जिल्हा परिषदेचे स्वतःचे उत्पन्न कमी आहे. ते वाढवण्यासाठी तीस वर्षे जागा विकसनाचा विषय चर्चेत आहे. त्याला राज्य शासनाकडून प्रसिसादच मिळत नाही. महाविकास आघाडी सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्त आणि "आत्मनिर्भर' बनवण्यासाठी पुढाकार घेण्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनी जिल्हा परिषदेच्या समोरील दक्षिण दिशेची जागा सभागृह आणि कॉम्प्लेक्‍ससाठी विकसीत करण्याचा प्रस्ताव चर्चेत आणला आहे. त्यासोबत आता वसंत बंगल्याची चर्चा पुढे आली आहे. अर्थात नकटीच्या लग्नाला सतरा विघ्ने अशी स्थिती आहे. राज्य शासन कसे पाहते, यावर बरेच अवलंबून असेल. 

""वसंत बंगल्यात रहायला गेलेला मी पहिला अध्यक्ष. सलग अकरा वर्षे मी तेथे होतो. बंगला बांधला त्यावेळी तेथे फार वर्दळ नव्हती. आता तो भाग व्यावसायिकदृष्ट्या खूप महत्वाचा बनला आहे. तेथे कॉम्प्लेक्‍स बांधायला काहीच हरकत नाही. महात्मा गांधी वसतीगृह आणि पंचायत समिती मालकीच्या जागाही विकसीत करायला हव्यात. जेणेकरून जिल्हा परिषदेचे स्वतःचे उत्पन्न वाढेल.'' 
 

- शिवाजीराव नाईक, माजी आमदार 

""सांगली-मिरज रस्त्यावर विश्रामबागसारख्या गजबजलेल्या ठिकाणी दहा गुंठे जागा ही मोठी संपत्ती आहे. जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी तिचा वापर करता येऊ शकेल. तेथे कॉम्प्लेक्‍स झाले तर नक्कीच फायद्याचे ठरेल, यात शंका नाही. एक चांगला प्लॅन करून पुढे जावे लागेल.'' 

-संग्रामसिंह देशमुख, 
माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद सांगली 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Tragic Diwali : दुर्दैवी! ऐन दिवाळीत अपघातांची मालिकाच, कोल्हापुरात एका दिवसात ४ जणांचा अपघाती मृत्यू

India vs Australia 2nd ODI : रोहित शर्माला शेवटची संधी? गौतम गंभीरचा प्लॅन बी तयार; युवा खेळाडूकडून करून घेतला कसून सराव...

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये टवाळखोरांचा धुडगूस, वाहनांची केली तोडफोड

Pune Air Pollution : पुण्यात यंदा दिवाळीला मागील वर्षी पेक्षा प्रदूषण कमी, हवेची गुणवत्ता सुधारली; नागरिकांना काही प्रमाणात दिलासा

Kolhapur Accident : ‘मामा... असं कसं झालं हो..!, कोणावरही वेळ येऊ नये अशी कांबळे कुटुंबावर आली; भाच्याने फोडलेला टाहो काळीज फाडणारा...

SCROLL FOR NEXT