Confusion about 'Orange Zone': Will know only after order 
पश्चिम महाराष्ट्र

'ऑरेंज झोन'बाबत संभ्रम : काय सुरू, काय बंद; आदेशानंतरच कळणार 

सकाळवृत्तसेवा

सांगली ः लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात काय सुरू होणार आणि काय बंद होणार, याबाबत केंद्र आणि राज्य शासनाकडून सूचनांवर सूचना व्हायरल होत असताना जिल्हास्तरावर मात्र आज सारे काही सामसूम होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी आणि महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी राज्याच्या मार्गदर्शक सूचनांच्या प्रतीक्षेत असल्याचे आज रात्री सांगितले. त्यामुळे 3 मेनंतर पुढे काय याचा उलगडा जिल्ह्यातील नागरिकांना होऊ शकला नाही.

सांगली जिल्ह्याचा ऑरेंज झोनमध्ये समावेश झाल्याचे आज सकाळी वृत्तवाहिन्यांवरून जाहीर झाले. त्यानंतर दिवसभर केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांचा पाऊस सुरू होता. त्यामुळे शहरासह जिल्हाभरातील व्यापारी, उद्योजक, अडकून पडलेले नागरिक असे सर्वांपुढे यक्ष प्रश्‍न होता. त्याबद्दल काही चित्र स्पष्ट होईल, या आशेने आज दिवसभर सकाळच्या कार्यालयात नागरिकांची विचारणा सुरू होती. जिल्हाधिकाऱ्यांनी दुपारी पत्रकारांशी वार्तालाप केला, मात्र त्यांनी पुढे काय या प्रश्‍नावर अद्याप वरून सूचना नाहीत एवढेच सांगितले. आयुक्त कापडणीस यांनीही शहरातील बांधकामांसह व्यापाराबाबत पुढे काय, या प्रश्‍नांचे उत्तर अद्याप आपल्याकडे नसल्याचे सांगितले. 

राज्य सरकारने टाळेबंदीत अडकलेल्या मजूर, यात्रेकरू, विद्यार्थी, पर्यटक तसेच अन्य काही कामानिमित्त अडकलेल्या व्यक्तींना त्यांच्या मूळ ठिकाणी जाण्यासाठी काही अटींवर परवानगी दिली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्राच्या सूचनांबाबत त्यांनी राज्य सरकारकडून अद्याप काहीच माहिती आलेली नसल्याचे स्पष्ट केले. याबाबत राज्य सरकारचे आदेश आल्यानंतर तातडीने माहिती जनतेला दिली जाईल, असे सांगितले. राज्य सरकारने कोणतेही नव्याने आदेश काढले नसल्याने लोकांत केवळ चर्चाच राहिली आहे. निर्णयाची प्रतीक्षा कायम आहे. 

दुकाने बंदच ठेवा 
व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा म्हणाले, ""प्रशासनाच्या कोणत्याही स्पष्ट सूचनांशिवाय व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवू नयेत. याबाबत चर्चा सुरू आहे, मात्र काही दुकाने उघडी दिसत असून, त्याबाबत नाईलाजाने प्रशासनाकडून गुन्हे दाखल होऊ शकतात. एकदा गुन्हे दाखल झाल्यानंतर पुन्हा दुकाने उघडू शकणार नाहीत. काहींच्या चुकांमुळे सगळी बाजारपेठच बंद होऊ शकते. त्यामुळे पुढील सूचना येईपर्यंत व्यापाऱ्यांनी दुकाने बंदच ठेवावीत.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT