पश्चिम महाराष्ट्र

रामायण, महाभारत बरोबरच ‘या’ मालिकाही सुरू करा : पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा

सातारा : लॉकडाउनच्या काळात रामायण, महाभारत मालिकांचं पुर्नप्रक्षेपण करण्यात यावं, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आल्यानंतर केंद्र सरकारनं या दोन्ही मालिकांबरोबरच शक्तीमान मालिका सुरू केली आहे. त्याचसोबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रामायण, महाभारतच्या समकालीन असलेल्या दोन मालिका प्रक्षेपित करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने श्‍याम बेनेगल यांच्या लोकप्रिय संविधान आणि डिस्कवरी ऑफ इंडिया या सुद्धा मालिका सुरू कराव्यात अशी विनंती मी केली आहे, अशी माहिती चव्हाण यांनी ट्‌विट करून दिली. दरम्यान सध्या देशवासियांना आश्‍वस्त करण्याची खरी गरज आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी टाळी, थाळी आणि आता दिवाळी अशी लोकांसमोर मांडलेली त्रिसूत्री दुर्दैवी आहे, अशी टीका देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकाद्वारे केली. 
 

कराड : कोरोना विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकतर्फी संवाद साधण्यापेक्षा पत्रकार परिषद घेऊन देशवासियांना आश्‍वस्त करण्याची खरी गरज आहे. मात्र त्याऐवजी त्यांनी टाळी, थाळी आणि आता दिवाळी अशी लोकांसमोर मांडलेली त्रिसूत्री दुर्दैवी आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकात नमूद केले आहे.

आमदार चव्हाण म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्हीसमोर येत पुन्हा एकदा स्वागत केले. पाच एप्रिलला रात्री नऊ वाजता सर्व भारतीयांनी घरात अंधार करून दिवे लावण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मागील 15 दिवसांच्या कालावधीत पंतप्रधान मोदी यांचे हे तिसरे भाषण असून, प्रत्येकवेळी कोरोनाच्या विरोधात काहीतरी नवीन जुमला लोकांसमोर मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची टीका माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. पंतप्रधान मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात कोरोना संसर्गाविषयीचे आकडे, आरोग्य व्यवस्थेची तयारी, लाखो स्थलांतरित मजुरांचा गंभीर प्रश्‍न, अर्थव्यवस्था ठप्प झाल्याने रोजगारावर होणारे परिणाम या मुद्यांना स्पर्श न करता दिवे लावण्याचे आवाहन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचा सामना करताना पंतप्रधान मोदी हे एकमेव जागतिक नेते आहेत, की ज्यांनी आतापर्यंत एकही पत्रकार परिषद घेतली नाही.

चमकण्यासाठी माेदी एकही संधी साेडत नाहीत काॅंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची टीका

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ते 31 मार्च या कालावधीत 28, तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आजारी पडण्याआधी 18 पत्रकार परिषदा घेऊन पत्रकारांच्या माध्यमातून आलेल्या जनतेच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. देश गंभीर परिस्थितीतून जात असतानाही कार्यालयात बसून अधिकाऱ्यांनी लिहून दिलेले भाषण वाचून एकतर्फी संवाद साधण्यापेक्षा पत्रकार परिषद घेऊन देशवासीयांना आश्वस्त करणे अपेक्षित होते; पण त्यांनी टाळी, थाळी आणि आता दिवाळीची मांडलेली त्रिसूत्री दुर्दैवी आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Supply: मुंबईतील धरणातील जलसाठा ८८ टक्क्यांवर, १० टक्के पाणीकपात कधी संपणार? महत्त्वाची माहिती समोर

Ajinkya Rahane: क्रिकेट संपलं तुझं कौतुक कमी झालं, पण तूच आमचा खरा हिरो! अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर आई वडिलांचं भावूक पत्र व्हायरल

Pune Bangalore Highway : पहिल्याच पावसात 6 पदरी महामार्गाचे पितळ उघडे! गांधी रुग्णालयाजवळ उड्डाणपुलाची भिंत कोसळली; प्रवास बनला धोकादायक, निकृष्ट कामाबद्दल कारवाई होणार का?

Latest Marathi News Live Update : भिवंडी इमारत दुर्घटना : दोषींवर कठोर कारवाईचे आदेश; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी भेट

Pune News: आळेफाटा येथील जिल्हा परीषदेच्या शाळेजवळ अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळी कचरा टाकणा-यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी

SCROLL FOR NEXT