Congress leader Siddharth Jadhav joins Shiv Sena esakal
पश्चिम महाराष्ट्र

Miraj Politics : काँग्रेसला धक्का देत सिद्धार्थ जाधवांचा ठाकरे गटात प्रवेश; 'या' मतदारसंघातून लढवणार निवडणूक?

जाधव यांनी गेली पंधरा वर्षे काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ शिवसेनेकडे येणार असल्यामुळे भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात थेट लढतीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मिरज : मिरज तालुक्यातील काँग्रेसचे नेते प्रा. सिद्धार्थ जाधव (Congress leader Siddharth Jadhav) यांनी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Uddhav Thackeray) गटात प्रवेश केला. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी मिरज मतदारसंघ (Miraj Constituency) महाविकास आघाडीकडून शिवसेनेला सोडला जाण्याची शक्यता आहे.

या अनुषंगाने प्रा. सिद्धार्थ जाधव यांनी मुंबई येथे मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेतला. जाधव यांनी गेली पंधरा वर्षे काँग्रेसमध्ये विविध पदांवर काम केले आहे. यापूर्वी २०१४ ची विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढवली. त्या वेळी दुसऱ्या स्थानाची मते मिळवून प्रतिस्पर्धी उमेदवार तथा विद्यमान मंत्री सुरेश खाडे यांच्याशी अटीतटीची लढत दिली होती.

काँग्रेसच्या मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे; तर कर्नाटक राज्याचे पक्ष निरीक्षक म्हणूनही काँग्रेसकडून त्यांना संधी देण्यात आली होती. या आधी मिरज विधानसभा भाजप, काँग्रेस आणि शिवसेना अशा तिरंगी लढतीत काँग्रेस आणि शिवसेना हे अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर असायचे. मात्र, यंदा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी समवेत असल्यामुळे मिरज मतदारसंघाची लढत अटीतटीची होणार आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रा. सिद्धार्थ जाधव यांना शिवबंधन बांधले. तसेच मिरज मतदारसंघासाठी कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. महाविकास आघाडीकडून हा मतदारसंघ शिवसेनेकडे येणार असल्यामुळे भाजप आणि शिवसेना ठाकरे गटात थेट लढतीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावेळी शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख नितीन बानगुडे-पाटील, जिल्हाप्रमुख संजय विभूते, अविनाश पाटील यांच्यासह पदाधिकारी, सांगली जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Girl Death : हृदयद्रावक! झोका खेळताना ओढणीचा फास लागून सातवीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; संसाराला हातभार लावणाऱ्या मोठ्या मुलीचा दुर्दैवी शेवट

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, ठाकरेंनी ऐनवेळी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

MNS: मनसेची कल्याण-डोंबिवलीत मोठी मोर्चेबांधणी; हर्षद पाटील शहराध्यक्ष, नव्या टीमची घोषणा

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

SCROLL FOR NEXT