पश्चिम महाराष्ट्र

महाराष्ट्रातील 'या' अडचणी दूर व्हाव्यात; काँग्रेस समितीच्या टास्क फोर्सची मागणी

हेमंत पवार

कऱ्हाड : रेशनिंग कार्ड किंवा आधार कार्डाचा पुरावा न बघता गरजुंना रेशनिंगचे धान्य द्यावे, शेतकऱ्यांचा शेतमाल शहरात येण्यासाठी बाजार समित्या खुल्या कराव्या, त्यासंदर्भातील निर्णय त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याचे अधिकार द्यावे, रुग्णांच्या सोयीसाठी बंद असलेली खासगी रुग्णालये तातडीने सुरु करावी, उद्योगधंदे सुरु करण्याबाबत विचार व्हावा आदी महत्वपुर्ण सुचना प्रदेश काँग्रेस समितीच्या टास्क फोर्समधील सदस्यांनी आज (साेमवार) केल्या. दरम्यान टास्कफोर्सचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे त्यासंदर्भातील अहवाल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पुढील कार्यवाही पाठवणार आहेत.

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. रूग्णांची संख्याही वाढत आहे. याआपत्तीत सरकारच्या बरोबरीने काँग्रेस पक्षही सर्व प्रकारची मदत करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रदेश काँग्रेस समितीने टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. त्याचे अध्यक्षपद माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आहे. त्यांनी टास्कफोर्समधील 18 सदस्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सींगव्दारे आज बैठक घेतली. बैठकीत सदस्यांनी रेशनिंगचे धान्य मिळताना अडचणी येत आहेत. ज्यांच्याकडे आधार कार्ड, रेशनिंग कार्ड आहे त्याना रेशनिंगचे धान्य दिले जात आहे. मात्र ज्यांच्याकडे पुरावाच नाही त्यांना गरज असतानाही धान्य मिळत नाही. त्यामुळे गरजुंना पुरावा न बघता धान्य दिले जावे. सरकारने कोरोनाच्या तीव्रतेनुसार झोन केले आहेत. त्या झोनवाईज पीपीई कीट वाटपाचे नियोजन केले जावे. त्याचे अधिकार त्या-त्या जिल्हा्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना द्यावे. त्यामुळे गरजेच्यावेळी ते उपयोगी पडतील. शेतकऱ्यांकडे शेतमाल तयार आहे, मात्र बाजार समित्या बंद असल्याने त्या आणता येत नाही.

त्यामुळे शेतमाल शहरात येण्यासाठी बाजार समित्या तातडीने खुल्या कराव्या. त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान वाचेल. सध्या सरकारी व अन्य काही खासगी हॉस्पीटलमध्ये कोरोनाचे उपचार केले जात आहेत. मात्र खासगी रुग्णालये बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तातडीने खासगी रुग्णालये सुरु करावे. जेथे ग्रीन झोन आहे तेथील उद्योगधंदे सुरु करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी, अशा सुचना सदस्यांनी केल्या. त्यानंतर आमदार चव्हाण म्हणाले, कोरोनाच्या संकटावर सरकारला साथ करायची आणि काही सुचना देण्याकरिता काँग्रेस पक्षाने टास्क फोर्सची निर्मिती केली आहे.

या टास्क फोर्सच्या सदस्यांकडून विषाणूला रोखण्यासाठी आणि महाराष्ट्रावर आलेले संकट कसे दूर करता येईल याबाबत सर्वांकडून सुचना घेतल्या. ही बैठक दोन तास सुरू होती. त्यामध्ये वैद्यकीय सुविधा, शेती, रेशनिंग, उद्योगाला चालणा देणे आणि लॉकडाऊन व तो उठल्यानंतर काय कार्यवाही करावी या पाच मुद्यावर प्रामुख्याने सखोल चर्चा झाली. त्यानंतर पक्षाच्या व अन्य काही विषयांवरही चर्चा झाली. जोपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे, तोपर्यंत या बैठका घेतल्या जातील. ज्या सुचना येतील त्या सर्व एकत्र करुन त्याचा अहवाल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पक्षाच्यावतीने पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्द करणार आहोत.

Lockdown : लाखमोलाचा शेतमाल कचराकुंडीत; रस्त्यावर फेकून देऊन अश्रू ढाळीतच त्यांना घर गाठावे लागले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांना मोठा धक्का! महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेची संलग्नता रद्दच, याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

Pune News: आमच्या हद्दीत कारवाई करायची नाही; आरटीओ अधिकाऱ्याची निरीक्षकाला धमकी, ऑडिओ व्हायरल, परिवहनमंत्र्यांकडून कारवाईचे आदेश

Monsoon Update : चिंता वाढली ! मान्सूनचा प्रवास आणखी रखडला, आता 'या' तारखेला मुंबईसह राज्यात होणार दाखल; हवामान विभागाचा नवा अंदाज जाहीर

Kolhapur Irrigation Department : कोल्हापूर पाटबंधारे विभागाचा शेतकऱ्यांना दणका, दहा नद्यांना उपसाबंदीचे आदेश; अनिधिकृत उपसा केल्यास थेट कारवाई

Tadoba Safari: पर्यटकांसाठी खुशखबर! ताडोबा, पेंचसह सर्व व्याघ्र प्रकल्पांतील कोअर सफारी ३० जूनपर्यंत सुरू, नवे वेळापत्रक

SCROLL FOR NEXT