In connection with the PSI Corona patient 
पश्चिम महाराष्ट्र

पीएसआय कोरोनाबाधिताच्या संपर्कात, पत्नी, मुलांसह नातेवाईक आणले तपासणीला

सकाळ वृत्तसेवा

संगमनेर ः तालुक्यातील एका गावातील रहिवाशी असलेले पोलिस उपनिरीक्षक मुंबईत सेवा बजावताना कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. दरम्यानच्या काळात मागील आठवड्यात त्यांची पत्नी व दोन मुलगे संगमनेर तालुक्यातील त्यांच्या मुळ गावी आले होते.

ही माहिती समजल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून या कुटूंबाच्या संपर्कात आलेल्या सात नातेवाईकांसह 10 जणांना आज नगरच्या जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी, संगमनेर तालुक्याच्या पूर्वेला असलेल्या एका गावातील पोलिस उपनिरीक्षक मुंबईत सेवेत आहेत. कर्तव्यावर असताना ते कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने, त्यांची तपासणी करण्यात आली.

मागील दोन-तीन दिवसांपूर्वी त्यांची पत्नी दोन मुलांसह सासरी आली होती. त्यांचे माहेरही या गावापासून अवघे दोन किलोमिटर असल्याने या मायलेकांनी सासरी व माहेरी प्रवास केल्याचे समजते. त्यांचा प्रवास व मुंबईतील माहिती आरोग्य सेवकांमार्फत आश्वी खुर्दच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात समजली. त्यांनी याबाबत तातडीने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी प्रांताधिकारी व तहसीलदार यांना कल्पना दिली. 

संबंधित अधिकाऱ्याची पत्नी व दोन मुलांसह संपर्कात आलेल्या इतर सात नातेवाईकांना खबरदारी म्हणून जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लष्करच्या कुख्यात दहशतवाद्याला अटक, ISI च्या इशाऱ्यावर भारताविरोधात रचला होता मोठा कट

Pune Accident: काळाची हुलकावणी! पुणे जिल्ह्यातील वरंधा घाटातील अपघातात ११ जखमी; अंत्यविधीसाठी जाताना नेमकं काय घडलं..

Blog: युद्ध संपुष्टात येणे नाही

Accident News : संख-पंढरपूर मार्गावर उमदीजवळ भीषण अपघात; १ चा मृत्यू, ६ महिला जखमी

Kinwat School Closure: तीन दिवस उलटूनही शिक्षण विभाग जागा नाही; किनवट तालुक्यातील शाळेला कुलूप, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान!

SCROLL FOR NEXT