mahapalika.jpg
mahapalika.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

भाजप कार्यकर्ते आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांत यावरून जुंपली 

सकाळवृत्तसेवा

सांगली-कोरोना विषाणूचा संसर्गाचा पार्श्‍वभूमीवर शहरात "लॉकडाऊन' सुरू असल्यामुळे महापालिकेकडून दिव्यांगांसाठी कीट वाटप सुरू आहे. आज याच्या श्रेय वादातून शिंदे मळा-अभिनंदन कॉलनीत भाजप कार्यकर्ते आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक यांच्यात वाद झाला. फुकटचे श्रेय का घेता? असा जाब विचारल्यानंतर नगरसेवकांनी तेथून काढता पाय घेतला. आज दिवसभर याची चर्चा रंगली होती. 


काही स्वयंसेवी संस्थांनी महापालिकेला जीवनावश्‍यक वस्तूंचे कीट दिले आहेत. शिंदे मळा परिसरात महापालिका कर्मचारी, दिव्यांगांसाठी प्रशासनातर्फे कीट वाटप करण्याचे काम सुरू होते. शासनाच्या निर्देशानुसार दिव्यांगाना हे कीट महापालिका प्रशासन घरपोहोच देत आहे. आज महापालिकेचे काही अधिकारी, कर्मचारी कीट वाटण्यासाठी प्रभाग क्र. 9 मधील संजयनगरजवळील शिंदे मळा, अभिनंदन कॉलनी येथे आले होते. 


दिव्यांगाना कीट वाटप सुरू झाल्यानंतर स्थानिक कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नगरसेवक तेथे आले. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत कीट वाटप सुरू झाले. यावेळी दिव्यांग संघटनेच्या कार्यकर्त्या आशा पाटील यांच्यासह काहीजण तेथे उपस्थित होते. दरम्यान नगरसेवकांच्या उपस्थितीत महापालिकेचे कीट वाटप सुरू असल्याचे समजताच भाजपचे पदाधिकारी अतुल माने, दरिबा बंडगर, भूपाल सरगर तेथे पोहोचले. कीट वाटपात नगरसेवकांचा संबंधच काय ? असा जाब विचारत कीट वाटप रोखले. 


महापालिका प्रशासनाकडे असलेल्या नोंदीनुसार कीट वाटप होत आहे. त्यामुळे नगरसेवक खोटे श्रेय कशासाठी घेतात? नागरिकांची दिशाभूल केली जात आहे? असे ठणकावत अशा पद्धतीने कीट वाटप होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळे भाजप कार्यकते आणि नगरसेवकांत वाद जुंपला. प्रशासनाने आमचे आम्ही दिव्यांगांना कीट वाटप करू असे सांगत वादावर पडदा टाकला. त्यामुळे नगरसेवकांनी तेथून काढता पाय घेतला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT