gharkul at akole 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोनाने गरिबांचं घरकुलही हिरावलं

सकाळ वृत्तसेवा

अकोले : तालुक्‍यातील घरकुलांची कामे सुरू असतानाच कोरोनाचे संकट आले. त्यामुळे सर्व कामे जैसे थे राहिली आहेत. भंडारदरा पाणलोटक्षेत्रातील 12 गावे, वाडी-वस्तीत 50हून अधिक घरांची कामे अर्धवट आहेत. दुसरा हप्ता मिळाला नि कामे थांबली. ही कामे पुन्हा सुरू करण्याची मागणी होत आहे. आदिवासी लोक घराशेजारी झोपडी बांधून किंवा झाडांच्या सावलीत दिवस काढत आहेत. उडदावणे, पांजरे, मुरशेत, साम्रद, शिंगणवाडी येथे हे चित्र दिसते. 

पंचायत समिती अंतर्गत स्थानिक ग्रामपंचायतीने दारिद्य्ररेषेखालील कुटुंबांना घरकुलांचा लाभ दिला. मार्चमध्ये त्यांना दुसरा हप्ता मिळाला असून, तत्पूर्वीच जुने घर पाडून नवीन बांधकाम आदिवासी लाभार्थींनी सुरू केले होते. घराशेजारी तात्पुरती झोपडी बांधून त्यात हे लोक राहत आहेत. मात्र, अचानक कोरोनाचे संकट आले नि कामे थांबली. घराचे स्वप्न उराशी बाळगून आदिवासी लोक झोपडीत दिवस कंठत आहेत. त्यात हाताला काम नाही, खायला घास नाही. जंगलात मिळेल, त्यावर कशीतरी त्यांची गुजराण सुरू आहे. 

कडक उन्हाळ्यामुळे सकाळीच पाण्याच्या शोधात ही माणसे निघतात. दुपारी शेतात राब जाळण्याचे काम चालते. या परिसरात किमान 75 घरकुलांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. उडदावणे येथील वृद्ध रामा लोटे घराचे काम अपूर्ण असल्याने झाडाखाली बसले होते. दोन हप्ते मिळाले, सरकार तिसरा हप्ता देत नाही, तोपर्यंत घर झाकले जाणार नाही. त्यात पाऊस आला, तर मग कुठे तरी आडोशाला राहावे लागेल, असे ते सांगत होते. 

घरकुलाच्या अर्धवट कामामुळे आदिवासी लोक झोपडीत किंवा झाडाखाली राहतात. संबंधित विभागाने घरकुलांचा निधी तातडीने उपलब्ध करून दिल्यास या लोकांना बेघर जिणे जगावे लागणार नाही. 
- विनायक वाडेकर, सामाजिक कार्यकर्ते 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT