Corona is also suspected to be found in Sai Shirdi 
पश्चिम महाराष्ट्र

साईंच्या शिर्डीतही आढळली कोरोना संशयित 

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी ः कोरोनासदृश आजाराची लक्षणे दिसल्याने शहरातील लक्ष्मीनगर वसाहतीमधील साठ वर्षे वयाच्या महिलेला आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यानंतर लगेचच तेथील रहिवाशांनी घरे बंद केली.

उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन यांनी तातडीने हालचाल केल्यानंतर परिसरात नगरपंचायतीच्या यंत्रणेने औषधफवारणी केली. 
संबंधित महिला गेल्या महिनाभरापासून कोल्हार येथील नातेवाइकांकडे वास्तव्यास होती. तेथून आल्यानंतर खोकला व ताप येऊ लागल्याने तिने सावळीविहीर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेतले.

तेथील डॉ. भिंगारदिवे यांना या महिलेस कोरोनाची लक्षणे दिसत असल्याची शंका आल्याने, त्यांनी पोलिस व नगरपंचायत यंत्रणेच्या मदतीने सरकारी रुग्णवाहिकेतून तिला नगरला हलविले. 
या भागातील रहिवाशांनी बाहेर कुठेही जाऊ नये, असे आवाहन राहाता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गोकुळ घोगरे यांनी केले आहे.

दरम्यान, संबंधित महिला कुठे कुठे गेली होती, कुणाच्या संपर्कात आली होती, याचा शोध घेतला जात आहे. या महिलेच्या हातावर सलाईनची सुई लावलेली होती. डॉ. घोगरे यांना मिळालेल्या माहितीनुसार तिने साईबाबा संस्थानाच्या रुग्णालयात उपचार घेतले, की अन्य कोणत्या रुग्णालयात गेली होती, याची खातरजमा केली जाणार आहे. 

दिलासा मिळाला

रात्री उशिरा त्या महिलेची तपासणी करण्यात आली. त्यात तिला कार्डियाक अस्थमा निघाला आहे. त्यामुळे शिर्डीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्या महिलेच्या हातावर क्वॉरंटाइनचा शिक्का मारला असून तिला घरी सोडण्यात आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

रेसलिंग विश्वावर शोककळा! सामना खेळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ४० वर्षांच्या WWE स्टार PAC चे निधन

Pune Cleanliness Drive: पुण्यात अस्वच्छता करणाऱ्यांकडून ८ महिन्यांत १.८७ कोटींचा दंड; दंडवाढीचा प्रस्ताव तयार

Latest Marathi News Live Update: ठेकेदाराला सहा लाखाचा दंड

Asian Games: नीरज नव्हता, पण तरी यशवीर-रोहितने भालाफेकीत जिंकली मेडल्स; गुलवीरलाही ऐतिहासिक रौप्य

SCROLL FOR NEXT