Corona Effect: 1200 decoration Professionals in loss at Sangali 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोना इफेक्ट : 1200 मंडप व्यावसायिकांची होरपळ

सकाळवृत्तसेवा

सांगली ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व कार्यक्रमांना फाटा देण्यात आलेला आहे. लग्नसराईच नव्हे तर 30 जूनपर्यंत कोणत्याच कार्यक्रमांना परवानगीची शक्‍यता धूसर बनली आहे. जिल्ह्यातील 1200 मंडप व्यवसायिक त्यांना पूरक मंडप डेकोरेटर्स्‌वरील 9 हजार कामगारांवर उपासमारीचे संकट कोसळले आहे. मंडप व्यावसायाची शासनाने योग्य ती दखल घेऊन होरपळ कशी थांबेल हे बघितले पाहिजे असे मत मंडप लाईट आणि फ्लॉवर डेकोरेटर्स व्यावसायिक असोसिएशन अध्यक्ष सहदेव माळी, सचिव मधुकर मिरजे यांनी व्यक्त केले आहे.

ते म्हणाले, "गेल्या वर्षी आलेल्या महापुरातून मंडप व्यवसाय आता कोठे स्थिर होत होता. तोपर्यंत कोरोनामुळे मंडप व्यवसाय आणी त्यासोबत केले जाणारे लाईट व फ्लॉवर डेकोरेशन व्यवसाय पूर्णपणे मोडकळीस आलेले आहेत. महापुरामध्ये कितीतरी मंडप डेकोरेटर्सचे सामान वाहून गेले, कित्येकांचे स्टेजचे सेटअप्स खराब झाले, तर कित्येकांचे लाईट साहित्य निकामी झाले होते.

अशा सर्व गंभीर प्रसंगातून डेकोरेशन व्यावसायिकांनी मोठ्या हिमतीने प्रसंगी कर्जे काढून पुन्हा साहित्य खरेदी मोठ्या प्रमाणात केली होती, ती फक्त येणारी लग्न सराई नजरेसमोर ठेवूनच. तशी यावर्षी अपेक्षेनुसार कित्येक डेकोरेटर्सची कामेही चांगली बुकिंग झालेली होती. पण कोरोना महामारीमुळे सर्व कामे रद्द होऊन घेतलेली ऍडव्हान्स रक्कमही परत देण्यात आलेली आहेत. अशा परिस्थितीत वेगवेगळे कर भरणे आणि कामगारांना सांभाळणे अतिशय कठीण होऊन बसले आहे. 

ते म्हणाले, ""सध्या मंडप व्यावसायिक आणी मंडप कामगार वर्ग अंत्यत अडचणीत सापडलेला आहे. संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये साधारण 1200 हून अधिक मंडप व्यावसायिक आहेत. तसेच या व्यवसायामध्ये मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात आवश्‍यक्‍यता भासत असल्यामुळे कामगार संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. आजमितीस जिल्ह्यातील छोट्या मोठ्या अशा सर्व प्रकारच्या मंडप डेकोरेटर्सकडील कामगार संख्या ही अंदाजे 9000 च्या वर आहे. 

सिजनेबल व्यवसायाचे संकट 
तसेच किती तरी मंडप डेकोरेशनचे अंगावर काम घेणारे कुशल कामगार हजारोनी आहेत. आजच्या घडीला अशा सर्वावर मोठ्या उपासमारीचे संकट ओढवलेले आहे. सिजनेबल व्यवसाय करणाऱ्या आणी अशा बिकट परिस्थितीशी झुंजणाऱ्या मंडप व्यावसायाची शासनाने योग्य ती दखल घेऊन मंडप व्यावसायिकांची होणारी होरपळ कशी थांबेल हे बघितले पाहिजे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasant More Video: शिवतीर्थ, मातोश्री लांब राहिलं आधी..,दुबेंना मोरेंनी खडसावलं..

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पावसाअभावी लघु प्रकल्पांचा घसा कोरडाच

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT