corona virus in ahmednagar 
पश्चिम महाराष्ट्र

कोरोना : नाही ना... कोण म्हणतंय असं

सकाळ वृत्तसेवा

नगर ः चीनमधून नुकत्याच परतलेल्या आणि शुक्रवारी (ता. 7) जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या सुपे (ता. पारनेर) एमआयडीसीतील कामगाराच्या रक्ताच्या व घशातील द्रवाच्या नमुने घेतले होते. ते तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आले होते. तो आज (रविवारी) जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला. अहवाल येताच डॉक्टरांसह अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

त्या तरूणाच्या प्रकृतीत सुधारणा झाली अाहे. त्याला लवकरच सुटी दिली जाणार असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.

 
नेवासे तालुक्‍यातील हा 26 वर्षीय तरुण पंधरा दिवसांपूर्वीच चीनमधून परतला. खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्याने श्रीरामपूरमध्ये उपचार घेतले. शुक्रवारी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचे रक्ताचे व घशातील द्रवाचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविले होते. त्यांचा अहवाल जिल्हा रुग्णालयाला आज सकाळी प्राप्त झाला. अहवाल निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्‍वास सोडला. 

दरम्यान, सुपे (ता. पारनेर) एमआयडीसीतील सुमारे 28 जणांची तपासणी जिल्हा रुग्णालयाच्या पथकाने केली आहे. त्यांतील तीन जणांना शनिवारी खोकल्याचा त्रास जाणवला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आल्याने ते ठणठणीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नेवासे तालुक्‍यातील "त्या' तरुणाच्या कोरोना व स्वाईन फ्लू आदी तपासण्या करण्यात आल्या. त्या सर्व तपासण्यांचे अहवाल "निगेटिव्ह' आले आहेत. 


अफवांना पेव 
चीनमधून परतलेल्या नेवासे तालुक्‍यातील रुग्णाला खोकल्याचा त्रास सुरू झाल्याने आणि त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने सोशल मीडियावर अफवांना पेव फुटले होते. अनेकांनी कोरोना विषाणूची बाधा झाल्याचा संशय म्हणून "पोस्ट' केल्या होत्या. मात्र, संबंधित तरुणाला कसलीही बाधा झालेली नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. 

 
"त्या' तरुणाचा अहवाल "निगेटिव्ह' आला आहे. जनतेने घाबरून जाण्याचे कारण नाही. सर्व परिस्थितीशी सामना करण्यासाठी जिल्हा रुग्णालय सज्ज आहे. आरोग्याबाबत नागरिकांनी कुठल्याही गोष्टीची खात्री केल्याशिवाय सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करू नयेत. 
- डॉ. प्रदीप मुरंबीकर, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानभवनाची लॉबी की कुस्तीचा आखाडा? जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारीचा Exclusive Video

BCCI Video: लॉर्ड्सवर भारताच्या 'यंगिस्तान'ची हजेरी! U19 कर्णधाराने स्टेडियममध्येच केला वाढदिवस साजरा; वैभव सूर्यवंशीही भारावला

Gopichand Padalkar: विधानभवनात राडा झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया; 'मला आमदार म्हणून रहायचं नाही...'

NAV in Mutual Funds: म्युच्युअल फंडातील NAV म्हणजे काय? जाणून घ्या सोप्या भाषेत

Consanguineous Marriage: नात्यातील विवाह की आजारांचा वारसा? पुढच्या पिढीचं आरोग्य वाचवणारा सल्ला

SCROLL FOR NEXT