Corona infection is increasing carelessly in rural areas 
पश्चिम महाराष्ट्र

ग्रामीण भागात निष्काळजीपणाने वाढतोय 'कोरोना'; वाचा कुठे?

हिंम्मतराव नायकवडी

बिळाशी (जि. सांगली) : 'कोरोना' विषाणूचा राज्यातील शिरकाव थोपविण्यासाठी अविरतपणे केंद्र, राज्य शासनासह महसुल, पोलीस तसेच आरोग्य विभागातील डॉक्‍टर्स, नर्स, सफाई कर्मचारी त्यांना सहाय्यभूत आशा स्वयंमसेविका, अंगणवाडी शिक्षिका, गावोगावच्या असणाऱ्या 'कोरोना' समित्या, स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी आदींची साथ मिळत आहे त्यांचे कौतुकच करायला हवे. 

मुंबई, पुणे आदी शहरी भागांमध्ये लोकवस्ती प्रचंड असल्याने रुग्ण संख्येत काहिवेळेस झपाटयाने वाढ होत असली तरी रुग्ण बरे करण्यासाठी राज्य सरकारचे चाललेले युद्ध पातळीवरील काम कौतुकास्पद असेच आहे. ग्रामीण भागात अलीकडील काही दिवसांमध्ये रुग्ण संस्ख्येत वाढ होत आहे त्याला काही अंशी कारणीभुत ग्रामीण भागातील ग्रामस्थ तसेच शहरी भागातून गावी दाखल झालेले बांधव विशेष आपल्या काळजीसह 'कोरोना' महामारीला गांभीर्याने घेत नसल्याने तसेच खरी माहिती स्थानिक 'कोरोना' समित्या, आरोग्य कर्मचारी यांच्यापासून लपवत असल्यानेच फैलाव वाढतो आहे.

शहरी भागातून गावी दाखल झालेल्या बांधवांना बहुतांश गावात क्वोरोंटाईन करताना स्थानिक शाळा, विशेषतः सर्व सोय असल्यास 'होम क्वोरोंटाईन' केले आहे तर काहींना संस्थात्मक अलगीकरण केले असले तरी ते स्वतः व त्यांच्या सहवासात येणारे नातलग निष्काळजीपणाने वागत असल्याने, शारिरीक अंतराचे पालन, एकमेकांमध्ये संवाद साधताना 'मास्क' चा वापर, सॅंनिटायझर,आरोग्याची नीट काळजी न घेणे होत नसल्याने 'कोरोना' विषाणूच्या संसर्गाचा धोका ग्रामीण भागातही वाढू लागला आहे. आतापर्यंत शिराळा-पश्‍चिम-उत्तर भागात निगडीत (4),रेड (3),अंत्री खुर्द (1),मोहरे (2),खिरवडे (2),करूगली (1),चिंचोली (1),मणदूर (6),काळोखेवाडी (1),रिळे (4),कोकरूड-माळेवाडी (1) असे एकूण तालुक्‍यात 26 'कोरोना' रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी पश्‍चिम भागात 18 रुग्ण आहेत.पैकी निगडी (2),रेड (2),मोहरे (1),करुंगली (1) आदी सहा रुग्णांनी 'कोरोना' वर मात केली आहे. 'मोहरे' येथील एकमेव रुग्ण 'कोरोना' ने दगावला आहे. 

लक्षणेच जाणवत नाहीत 
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील वातावरण आरोग्यदायी, पोषक असल्याने तसेच काहीअंशी 'कोरोना' ची काहिंना लक्षणेच जाणवत नसल्याने, कोरोना बाधीत व्यक्ती सदृढ असल्याने त्यांना 'कोरोना' ची लक्षणे काहीअंशी असतीलही दिसत मात्र नाहीत. परंतु प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या व्यक्ती त्यांच्या सहवासात गेल्यास मात्र त्या प्रतिकारशक्ती कमजोर असणाऱ्या व्यक्तीला 'कोरोना' ची बाधा होऊ शकते. यासाठी शारीरिक अंतर राखने,मास्क वापरणे गरजेचेच आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT