Corona Patient Dies in Ahmednagar?
Corona Patient Dies in Ahmednagar? 
पश्चिम महाराष्ट्र

नगरमध्ये कोरोनाचा पहिला बळी..? पण दुसरा रिपोर्ट काय सांगतो

सकाळ वृत्तसेवा

नगर-श्रीरामपूर ः नगर जिल्ह्यात कोरोनाने तरूणाची बळी घेतल्याची चर्चा आहे. त्या तरूणावर पुण्यात उपचार सुरू होते. जिल्ह्यात आतापर्यंत २६ रूग्ण होते. त्यातील तीन ठणठणीत बरे झाले आहेत. मात्र, एका तरूणाला जीव गमवावा लागला. त्या तरूणाचा पहिला अहवाल पॉझिटीव्ह आला होता. मात्र, त्याला इतरही बऱ्याच आजारांनी ग्रासले होते. 

श्रीरामपूर तालुक्यातील हा रूग्ण कोणाच्या संपर्कात आला होता. हे प्रशासनाने शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना तो धागा सापडला नाही. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व कुटुंबीय व डॉक्टरांचेही स्वॅब घेण्यात आले होते. त्या सर्वांचेच अहवाल निगेटीव्ह आले होते. त्याला जिल्हा रूग्णालयातही दाखल करण्यात आले होते. तेथे त्याचा अहवाल निगेटीव्ह आला होता. त्यामुळे येथून गेल्यानंतर त्याला बाधा झाली असावी, असे प्रशासनाचे म्हणणे होते.

त्या तरूणाचा दुसऱ्यांचा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यात तो निगेटीव्ह आला. मग त्याचा जीव नेमका कशामुळे गेला, याविषयी प्रश्नचिन्ह आहे. हे तपासणीअंतीच कळणार आहे.

गोवर्धनपूरचा रहिवासी आहे

गोवर्धनपूर येथील कोरोनाबाधित मंतिमद तरुणाचा पुणे येथे उपचारादरम्यान आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास दुर्दैवी मृत्यु झाला. त्याला पुर्वीपासुन विविध आजाराने ग्रासले होते. त्यात कोरोना विषाणूची त्याला बाधा झाल्याने दिवसेंदिवस प्रकृती खालावत गेली. उपचार सुरु असताना अखेर त्याचे आज निधन झाले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. वसंत जमधडे यांनी या वृत्तास दुजोरा दिला. नगर जिल्ह्यातील हा पहिला कोरोनाचा बळी गेल्याने खळबळ उडाली.

आठ दिवसांपुर्वी सदर तरुणास फिट आल्याने नाऊर व हरेगाव येथील खासगी डाॅक्टरांकडे तपासणी केल्यानंतर त्याला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविले. तेथुन त्याला नगरला व नंतर पुणे येथील ससुन रुग्णालयात दाखल केले. तेथुन तो कोरोना बाधीत असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला मिळाला होता. 

अजून मृत्यूचा अहवाल नाही

दिवसेंदिवस त्याची प्रकती खालावत होती. आज त्याचा मृत्यु झाला असल्याची माहिती ससुन रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांनी मोबाईलद्वारे दिली, असे डाॅ. जमधडे यांनी सांगितले. सदर रुग्णाच्या मृत्युचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे ते म्हणाले. सदर तरुण मतिमंद होता. त्याला इतरही आजार असल्याने त्याची प्रतिकार शक्ती कमी होती. त्यामुळे त्याला कोरोना विषाणूची तात्काळ बाधा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

प्रशासनाने खबरदारी म्हणुन सदर तरुणाच्या थेट संपर्कात आलेले नातेवाईक, डाॅक्टर, सहायक, चालक अशा 26 जणांना तात्काळ ताब्यात घेत नगर येथे पुढील तपासणीसाठी हलविले होते. तेथे त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने घेवुन ते पुणे येथील राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थेकडे तपासणीसाठी पाठविले. तपासणी दरम्यान सर्वाचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. 26 पैकी बुधवारी (ता 8) तिघांचे तर काल 16 जणांचे अहवाल प्राप्त झाले.

उर्वरित अहवालही निगेटीव्ही

उर्वरीत सात जणांचे अहवाल आज नगर येथे प्राप्त झाले. त्यात सर्वजण निगेटिव्ह आले आहे. प्रशासनाने खबरदारी म्हणुन सर्वांना हाय रिस्क झोन मध्ये ठेवले आहे. पुढील चौदा दिवस वडाळामहादेव येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विलगिकरण कक्षात त्यांना विलग ठेवले आहे. चौदा दिवसांनंतर पुन्हा त्यांची तपासणी केली जाणार असुन त्यानंतर पुन्हा 48 तासांनंतर त्यांची फेर तपासणी होईल. त्यात ते निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. अशी माहिती डाॅ. जमधडे यांनी दिली.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 phase 4 Election Voting LIVE : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात; महाराष्ट्रातील 14 गावांचं तेलंगणामध्ये मतदान

महिला लैंगिक शोषण प्रकरण : 'माजी पंतप्रधानांच्या नातवाला आणण्यासाठी SIT परदेशात जाणार नाही'; गृहमंत्र्यांची माहिती

Share Market Today: आज शेअर बाजारात खरेदी होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

High Court : माजी सहकारमंत्र्यांचा 'तो' आदेश न्यायालयाकडून रद्द; 'जय भवानी'च्या चौकशीचा मार्ग मोकळा

Latest Marathi News Live Update : प्रज्वलला आणण्यासाठी एसआयटी परदेशात जाणार नाही - गृहमंत्री परमेश्वर

SCROLL FOR NEXT