पश्चिम महाराष्ट्र

विलगीकरण कक्षातील डॉक्‍टर, नर्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड ः कृष्णा हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या संशयिताने डॉक्‍टर, नर्स व स्टाफचा व्हिडीओ काढून तो सोशल मीडियावर प्रसारित केला. स्वतःच्या तोंडाला मास्क न लावता इतरांच्या जवळ जाऊन जीविताला धोका निर्माण करत डॉक्‍टर, नर्स व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, दमदाटी केली अशी फिर्याद कृष्णा हॉस्पिटलचे सुरक्षा विभागाचे प्रमुख विलास यशवंत चव्हाण यांनी दिली आहे. त्यावरून संबंधित दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.
 
पोलिसांची माहिती अशी ः जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार येथील कृष्णा रुग्णालयात कोरोना संसर्ग आजाराच्या पार्श्वभूमीवर संशयितांसाठी विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षातील संशयितांनी मास्क घालणे, स्वतःपासून दुसऱ्याला कोरोना होऊ नये म्हणून काळजी घेणे बंधनकारक आहे. मात्र, तरीही हॉस्पिटलच्या विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या दोघांनी काल स्वतः मास्क न घालता इतरांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य केले. त्यांच्या या कृत्यामुळे कोरोना रोगाचा संसर्ग पसरण्याचा संभव आहे, हे माहीत असतानाही त्यांनी विलगीकरण कक्षातील इतर रुग्णांजवळ जाऊन, तसेच इकडे- तिकडे फिरून संसर्ग पसरविण्याची कृती केली.

त्याचबरोबर दोघांनी विलगीकरण कक्षातील डॉक्‍टर, नर्स, तसेच कर्मचारी यांना शिवीगाळ, दमदाटी करत त्यांचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर प्रसारित केला. त्यावरून जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून संशयितांनी इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी संबंधिताविरोधात सुरक्षा विभागप्रमुख चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करत आहेत.

कोरोनाशी फाईट देताना 64 वर्षीय सातारा जिल्ह्यातील कराड येथील डॉ. शितल कुलकर्णी यांना आपले वयाचेही भान राहत नाही. इतकी ऊर्जा घेवून त्या स्वतः काम करतात. त्याशिवाय आरोग्य सेविका अन्‌ आशा स्वंयसेविकांनाही काम करण्याची प्ररेणा देतात. कशा पद्धतीने त्यांचे कार्य सुरु आहे घेऊया जाणून

Video : राज्यातील कापूस खरेदी साेमवार पासून 

रेशनिंग आणायला जाता ? मग आधी हे वाचा... 

Lockdown : सातारा जिल्ह्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे : शेखर सिंह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Navy Collision : अरबी समुद्रात भारत-पाक नौदलाच्या जहाजांची धडक; भारताचा पाकिस्तानला तीव्र इशारा

‘आज मुश्किल से बचे...’ शहनाज गिल बसलेलं विमान हवेत जोरात हलू लागलं, अभिनेत्री प्रचंड घाबरली, Viral Video

'सरकार चर्चा करायला तयार, शिवराळ भाषा आम्ही सहन करणार नाही'

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

Marathi News Live Updates : गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू

SCROLL FOR NEXT