Corruption in Pedgaon
Corruption in Pedgaon 
पश्चिम महाराष्ट्र

पेडगाव सोसायटीत सव्वा दोन कोटींचा अपहार 

संजय काटे

श्रीगोंदे  : तालुक्‍यातील पेडगाव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेत 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 दरम्यान दोन कोटी तेवीस लाख 41 हजार 699 रुपयांच्या रकमेचा अपहार झाल्याचे चौकशीत समोर आले आहे.

या प्रकरणी द्वारकानाथ राजहंस यांच्या फिर्यादीवरून संस्थेचे तत्कालीन सचिव व एक कर्मचारी अशा दोघांविरुद्ध श्रीगोंदे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुभाष हौसराव दळवी (अजनूज) व ईश्वर पंढरीनाथ गोधडे (पेडगाव) या संस्थेच्या तत्कालीन सचिव व लोकल कर्मचाऱ्यास या प्रकरणात आरोपी करण्यात आले आहे. 

अशी अाहे फिर्याद 

राजहंस यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की वरील दोघेही पेडगाव सहकारी संस्थेत सचिव व कर्मचारी म्हणून नोकरीस असताना त्यांनी वरील कालावधीत त्यांच्या पदाचा व अधिकाराचा दुरुपयोग करून संगनमताने संस्थेच्या मालकीच्या दोन कोटी 23 लाख 41 हजार 699 रुपये रकमेचा अपहार करून फौजदारी पात्र न्यासभंग करून संस्थेचे सभासद, संचालक, बॅंक, लेखापरीक्षक यांचा विश्वासघात करून फसवणूक केली. 

पाेलिस अधीक्षकांना त्रव्यवहार

सध्या हा तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव करीत आहेत. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेमार्फत करण्यासाठी पोलिस अधीक्षकांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT