Counting of nine grampanchayats in Shrigonde 
पश्चिम महाराष्ट्र

ग्रामपंचायतीत कोणाची बाजी, कोणाची आघाडी? 

संजय आ. काटे

श्रीगोंदे : तालुक्‍यातील नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी (ता.10) पार पडली. तालुक्‍याचे लक्ष लागलेल्या मांडवगण ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारत सत्ता काबीज केली. लोणी व्यंकनाथच्या सरपंचपदी बाळासाहेब नाहाटा गटाचे रामदास ठोंबरे विजयी झाले. अन्य ठिकाणच्या ग्रामपंचायतींमध्ये गावपातळीवर झालेल्या आघाड्यांनी सत्ता काबीज केली. 

गुरुवारी (ता.9) चार ग्रामपंचायतींची निवडणूक, तसेच पाच ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक, अशा नऊ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि सदस्यपदांसाठी मतदान झाले होते. नगरपालिकेच्या सभागृहामध्ये तहसीलदार महेंद्र माळी यांच्या नेतृत्वाखाली मतमोजणी करण्यात आली.

मांडवगण ग्रामपंचायतीत माजी सरपंच सिद्धेश्वर देशमुख, "राष्ट्रवादी'चे संजय आनंदकर व विश्वनाथ बोरुडे यांचा एकत्र पॅनल होता. सरपंचपदाच्या निवडणुकीत याच गटाच्या सुलभा सदाफुले यांनी अर्चना चव्हाण यांचा पराभव केला. कोकणगाव येथे विखे गटाचे संजय जामदार यांनी सत्ता स्थापन करत विरोधकांना धोबीपछाड दिला. भावडी येथे ऍड. सुनील भोस आणि विठ्ठल भोस यांच्या आघाडीने सत्ता मिळविली. 

लोणी नाहाटा यांचे वर्चस्व कायम

लोणी व्यंकनाथ येथील सरपंच अपात्र झाल्याने त्या ठिकाणी पुन्हा निवडणूक घेण्यात आली. नाहाटा यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठा पणाला लावणारी होती. त्यांच्या गटाचे रामदास ठोंबरे यांनी बाजी मारत स्वप्नील गायकवाड यांचा पराभव केला. 

गावनिहाय विजयी उमेदवार

कोकणगाव- उज्ज्वला रजपूत (सरपंच), सदस्य- प्रवीण जंबे, गणेश जामदार, सुवर्णा जामदार, संपत रजपूत, कौशल्या शिंदे, उषा काळे, अजित जामदार, पद्मावती शेंडगे, संगीता जंबे. 
भावडी- धनश्री करनोर (सरपंच), सदस्य- राहीबाई कोरडकर, दत्तात्रय शिंदे, कमलाबाई छत्तिसे, कविता भोस, अमृत पांडुळे, पूनम चोरमले, अनिल कोरडकर. 
मांडवगण- सुलभा सदाफुले (सरपंच), सदस्य- देविदास बोरुडे, राजेंद्र माळवदकर, जयश्री बोरुडे, सुभाष शिंदे, विश्वनाथ बोरुडे, अनिता लोखंडे, राजेंद्र देशमुख, सुदेष्णा रासकर, निशाबी काझी, संदेश शिंदे, चंदाबाई लोखंडे, अनुराधा हजारे, शिवाजी कंद, राधिका घोडके, पूनम वाघमारे. 
लोणी व्यंकनाथ- रामदास ठोंबरे (सरपंच), सदस्य- संदीप गाडे. 
महांडुळवाडी- दत्तात्रय घाडगे (सरपंच), सदस्य- पांडुरंग गुलदगड, चित्रा गोसावी, शीला महांडुळे, विठ्ठल कुसेकर, चेतन ठोंबरे, अनिता ननवरे, अनिल गोलांडे, सोजरबाई पवार, निर्मला घोडके. 
टाकळी लोणार- सूर्यभान जगदाळे (सरपंच). 
देऊळगाव गलांडे- रंभाबाई गायकवाड. 
भानगाव- संजय तोरडमल. 
पिंप्री कोलंदर- आशा ओहोळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction: कॅमेरॉन ग्रीनसाठी ऐतिहासिक बोली! KKR अन् CSK मध्ये जोरदार रस्सीखेच; बनला सर्वात महागडा परदेशी खेळाडू

Rupee Fall : ऐतिहासिक नीचांक! रुपया 91 पार; 1 डॉलर = 91.07 रुपये! कारण काय? महागाई वाढणार का?

IPL 2026 Auction : गडी पेटला... सर्फराज खानने २२ चेंडूंत चोपल्या ७३ धावा, ३३१.८२ चा स्ट्राईक रेट; सेलिब्रेशन तर भन्नाटच Video Viral

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज सुनावणी

प्रेक्षकांना कसा वाटला 'वचन दिले तू मला' मालिकेचा पहिला भाग? नेटकरी म्हणतात, 'एपिसोड छान होता पण...'

SCROLL FOR NEXT