पश्चिम महाराष्ट्र

108 वर्षांच्या आजींची जिद्दच भारी; जयंत पाटीलांकडून साडी चोळीचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा

सांगली : कोरोना (covid 19)आजाराच्या कहरामुळेच भल्याभल्यांना घाम फुटला मात्र इस्लामपूर शहरातील टकलाईनगर येथील १०८ वर्षीय जरीना अब्दुल शेख (Jarina Sheikh)यांनी कोरोनाला आपल्या जवळपास तर फिरकू दिलेच नाही उलट लसीचे दोन्ही डोस पूर्ण करून जिद्दीने लढण्याचा एक सामाजिक संदेशही दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील (Jayant patil)यांनी आज दोन्ही डोस पूर्ण केल्याबद्दल १०८ वर्षीय जरीना अब्दुल शेख यांचा साडी चोळी देऊन सत्कार केला.

मंत्री जयंत पाटील यांचा आपल्या मतदारसंघातील लोकांसमवेत असलेला ऋणानुबंध हा सर्वश्रुत आहे. याच ऋणानुबंधामुळे मंत्री जयंत पाटील यांना पाहताच जरीना आजीने 'लवकर आलास...' अशी हाक देत विचारपूस केली.

हेही वाचा- टास्क फोर्सच्या प्रोटोकॉल नुसार कोविड रुग्णांवर उपचार करा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

आमच्या इस्लामपूर येथील जरीना आजीने लसीचे दोन्ही डोस आज पूर्ण केले आहेत. लढण्याची आणि जगण्याची जिद्द काय असते हे आज जरीना आजीने दाखवून दिलं. लसीकरण हेच कोरोनावरील प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने लस घ्यावी आणि कोरोनाला पराभूत करावे असे आवाहन मंत्री जयंत पाटील यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Update : 'चुकीचं कास्टिंग' ते 'रील स्टार्सची भरती'; यंदाच्या सीजनबाबत प्रेक्षक झाले व्यक्त !

Beed News: सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर! फाटकासाठी थांबतेय रेल्वे; प्रवाशांचा जीव टांगणीला, अहिल्यानगर-बीड रेल्वेसेवेतील नियोजनाचा बोजवारा..

Latest Marathi News Live Update : अंकुश नगर खून प्रकरणातील फरार आरोपीला अटक

'बिग बॉस मराठी ६'च्या धुमाळीत कलर्स मराठीने केली नव्या मालिकेची घोषणा; 'या' हिंदी मालिकेची आहे कॉपी; प्रोमो पाहून प्रेक्षकांनी ओळखलं

Kolhapur Election : मिसळ पे चर्चेत विकासाचा अजेंडा; महायुतीचा जाहीरनामा जीवनमान बदलणारा, मूलभूत सुविधा देऊन कोल्हापूर घडवणार – आमदार क्षीरसागर

SCROLL FOR NEXT